मुंबई : ई-कॉमर्स वेबसाईट अमेझॉन इंडिया पुन्हा एकदा वादात सापडली आहे. यावेळी अॅश-ट्रेमुळे वाद निर्माण झाला आहे. या अॅश-ट्रेचं डिझाईन आक्षेपार्ह आणि अश्लिल आहे. नग्नावस्थेतील महिलेची प्रतिकृती असलेलं अॅश-ट्रे आहे. या वादानंतर अमेझॉनने अॅश-ट्रे वेबसाईटवरुन हटवून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला, तरी अमेझॉनवर पुन्हा एकदा टीकेची झोड उठली आहे.
मेटल अॅश-ट्रेची किंमत 4 हजार 441 रुपये आणि चिनी मातीपासून बनलेल्या अॅश-ट्रेची किंमत 299 रुपये असल्याचे अमेझॉन इंडियाच्या वेबसाईटवर सांगण्यात आले होते. हे प्रॉडक्ट अमेझॉनच्या वेबसाईटवर पाहताच सोशल मीडियावरुन आक्षेप घेण्यात आला आणि प्रॉडक्टवर बंदी आणण्याची मागणी जोर धरु लागली.
फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅपसह सर्वच सोशल मीडियावरुन अमेझॉन इंडियावर तुफान टीका सुरु झाली. त्यानंतर अमेझॉनने तातडीने अॅश-ट्रेचे हे वादग्रस्त प्रॉडक्ट वेबसाईटवरुन हटवले.
अमेझॉन वेबसाईटला वाद नवीन नाहीत. याआधीही वादग्रस्त प्रॉडक्ट्समुळे अमेझॉनवर टीका झाली आहे. याआधी भारतीय तिरंग्याचं चित्र असलेलेल डोअरमेट विक्रीसाठी वेबसाईटवर ठेवण्यात आले होते. त्यावेळी भारत सरकारने या प्रॉडक्टवर आक्षेप नोंदवत, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अमेझॉनला इशारा दिला होता. त्यानंतर कॅनडातील अमेझॉनच्या वेबसाईटने तिरंग्याचं चित्र असलेलं डोअरमेट हटवून माफी मागितली होती.
त्याही आधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं छायाचित्र असलेली चप्पलही विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. त्यावेळीही अमेझॉनवर तुफान टीका झाली होती.
एकंदरीतच अमेझॉनने चुका करणं, नंतर टीका झाल्याने माफी मागणं, हे काही नवीन नाही.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111






