👁 11 Views

बारामती उपविभागात पोलीस पाटील पदांची सोडत जाहीर

67 पदे महिलांसाठी आरक्षित; आजपासून भरती पक्रिया सुरु
बारामती, दि. 6 (प्रतिनिधी) – बारामती उपविभागातील पोलीस पाटील पदांसाठी आरक्षण सोडत प्रशासकीय इमारत येथे प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या हस्ते काढण्यात आली. उपविभागात 156 रिक्त पोलीस पाटील पदांपैकी 67 पदे महिलांसाठी आरक्षति झाली. यावेळी तहसिलदार हनुमंत पाटील, नायब तहसिलदार अनिल ठोंबरे, बारामती व इंदापूर तालुक्‍यातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रवर्ग, गावे, महिलानिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे – अनुसूचित जातीकरीता- जांब (महिला), गागरगांव, गिरवी (महिला), लासुर्णे (महिला), पळसदेव, बिजवडी, सणसर, गुनवडी, चिखली, तावशी, अगोती नं. 2 (महिला), ओझरे, चव्हाणवाडी (महिला), गणेशवाडी, कर्दनवाडी (महिला), उध्दट (महिला), काटेवाडी, बंडगरवाडी (महिला), अनुसूचित जमातीकरीता – भाटनिमगांव (महिला), कांबळेश्वर, कालठण नं.2, धूमाळवाडी (महिला), वरकुटे खुर्द, शहा, लोणीदेवकर, सरडेवाडी, सोनगांव (महिला), माळेगांव खुर्द (महिला), काटी, भावडी, कुरवली, शिर्सुफळ, जळगांव सुपे, अवसरी (महिला), विशेष मागास प्रवर्गासाठी – गाडीखेल, लाटे (महिला), सिध्देश्वर निंबोडी (महिला), तक्रारवाडी, अकोले, विमुक्त जाती (अ) साठी – वाणेवाडी, जोगवडी (महिला), खोरोची, अंजनगांव, कोऱ्हाळे खु (महिला), भटक्‍या जमाती (ब) साठी – निरनिमगांव (महिला), गोंदी, वकीलवस्ती, शेळगांव (महिला), शिरसोडी, कळाशी, भटक्‍या जमाती (क) साठी – थोरातवाडी (रुई) (महिला), वायसेवाडी, गोसावीवाडी, चाकाटी, तरंगवाडी, मराडेवाडी, खंडोबाचीवाडी (महिला), मोढवे (महिला), नेपतवळण, इतर मागास प्रवर्ग – मोराळवाडी, होळ (महिला), शेरेवाडी (महिला), माळेवाडी (पळ-इंदा) (महिला), सुरवड, निमगांव केतकी, माळवाडी, पोंदकुलवाडी, शिंदेवाडी, खामगळवाडी, देऊळवाडी (महिला), जाधववाडी, जंक्‍श्र्न, रणमोडवाडी, माळवाडी (लोणी भापकर) (महिला), बाबुर्डी (महिला), जाचकवस्ती (महिला), कळंब (महिला), न्हावी, आंबी बु. (महिला), मुर्टी (महिला), मेडद (महिला), शिरवली, ढाकाळे (महिला), मोरगांव (महिला), निरवांगी, बजरंगवाडी (महिला), कचरवाडी, सर्वसाधारण प्रवर्गासाठी – बळपुडी, झारगडवाडी (महिला), येळेवस्ती, खांडज, पवईमाळ, सोनकसवाडी, थोपटेवाडी, माळशिकारेवाडी, पिंगळेवस्ती (महिला), पांढरेवाडी, जराडवाडी, सावंतवाडी, साबळेवाडी, भिलारवाडी, चोपडज, सोरटेवाडी (महिला), मगरवाडी (महिला), कुतवळवाडी, भोंडवेवाडी (महिला), दंडवाडी, खंडूखैरेवाडी (महिला), देऊळगांवरसाळ (महिला), कारखेल, उंबरवाडी, सोनवडी सुपे (महिला), उंडवडी क. प., पोंधवडी, कऱ्हावागज (महिला), सावळ (महिला), कानाडवाडी (महिला), डाळज नं.3 (महिला), नारोळी (महिला), हगारेवाडी (महिला), लुमेवाडी, रेडा (महिला), भरणेवाडी (महिला), निमसाखर (महिला), परीटवाडी (महिला), बिरगुंडवाडी, गोतोंडी (महिला), कुरणेवाडी (महिला), पिटकेश्वर, घोरपडवाडी, सपकळवाडी (महिला), कचरवाडी, गलांडवाडी नं. 1 (महिला), गलांडवाडी नं. 2, कालठण नं 1 (महिला), अजोती (महिला), कांदलगाव (महिला), हिंगणगांव, बांडेवाडी, काळेवाडी, वरकुटे बु. (महिला), राजवडी (महिला), गांजेवळण, अगोती नं.1 (महिला), चांडगांव, शेटफळहवेली (महिला), रेडणी, बोराटवाडी (महिला), पंधारवाडी, पिंपळे, कडबनवाडी, निरावागज, सस्तेवाडी (महिला), निंबोडी (इंदा), वाकी, सराफवाडी अशी एकूण 156 गावे आहेत.
बारामती उपविभागात एकूण 156 रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. यामध्ये अर्ज करण्याचा कालावधी दि. 7 जून ते 21 जून 2017, वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 सुट्टीचे दिवस वगळून असा आहे. अर्जाची छाननी दिनांक 22 ते 23 जून या कालावधीत होणार आहे. पात्र उमेदवारांची प्रसिध्दी यादी दिनांक 27 जून 2017 रोजी होणार आहे. ओळखपत्र वाटप दि. 28 ते 30 जून 2017 या कालावधीत असणार आहे. टपालाने प्रवेशपत्र प्राप्त न झाल्यास दिनांक 1 जुलै 2017 रोजी उपविभागीय कार्यालय, बारामती येथून सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उपलब्ध करुन घ्यावे लागणार आहे. परीक्षा दिनांक दि. 2 जुलै 2017 रोजी सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत होणार असून परीक्षेचे ठिकाण नंतर कळविण्यात येणार आहे. मुलाखतीस पात्र उमेदवाराची यादी दि. 5 जुलै 2017 रोजी उपविभागीय कार्यालय, बारामती येथे सायंकाळी 6.00 नंतर प्रसिध्द केली जाणार आहे. कागदपत्रांची पडताळणी व तोंडी मुलाखत दि. 7 ते 11 जुलै 2017 या कालावधीत सकाळी 10.30 पासून उपविभागीय कार्यालय, बारामती येथे होणार आहे. अंतिम पात्र उमेदवारांची यादी दि. 12 जुलै 2017 रोजी सायंकाळी 6.00 नंतर प्रसिध्दी करण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेचा संपूर्ण तपशील तहसिल कार्यालय, बारामती व इंदापूर यांच्या नोटीस बोर्डवर तसेच गावी तलाठी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येणार आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *