👁 13 Views

भुकेलेल्या बकरीने ६६ हजार रुपये चावून खाल्ले!


पोटाची आग कोणाला काय करायला लावू शकते, याचा नेम नाही. माणसाच्या बाबतीत असे अनेक प्रसंग आपल्याला कधी-ना-कधी ऐकायला मिळतात. पण जनावरांच्या बाबतीत कानपूरमध्ये घडलेला हा किस्सा बहुधा पहिलाच असावा! भुकेनं व्याकूळ झालेल्या एका बकरीनं आपल्या मालकाचे तब्बल ६६ हजार रुपये चावून-चावून खाऊन टाकल्याची घटना इथं घडली आहे. बकरीच्या या ‘खाबुगिरी’नं सर्व आश्चर्यचकीत झाले आहेत.


कानपूरच्या सिलापूर गावात ही घटना घडली. सर्वेश कुमार पाल या शेतकऱ्यानं आपल्या पँटच्या खिशात दोन हजारांच्या ३५ नोटा ठेवल्या होत्या. घरी डागडुजीचं काम सुरू असल्यानं पालने नुकतेच बँकेतून पैसे काढले होते. पण ते काही त्याच्या नशिबात नव्हते. भूक लागल्यामुळं त्याच्या बकरीनं भिंतीला टांगलेली पँट ओढून खिशातील नोटा फस्त केल्या. बकरी नोटा खात असल्याचं समजताच त्यानं तिला हटकलं, पण तोवर तिनं ३३ नोटांचा फडशा पाडला होता. दोन नोटा कशाबशा सर्वेशच्या हाती लागल्या, पण त्याही कुरतडलेल्या स्थितीत होत्या.


‘माझी बकरी मला मुलासारखी आहे. कागदाचे तुकडे दिसले की ते खाऊन टाकायची तिला सवय आहे. पण असं काही होईल, असं मला वाटलं नव्हतं. तिला नोटा खाताना बघून काय करावं हेच मला कळलं नाही’, असं हतबल झालेल्या सर्वेश कुमारनं सांगितलं.


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *