👁 11 Views

करकंब येथे अवैध व्यवसायावर ग्रामीण पोलिस पथकाची कारवाई

करकंब:-
करकंब ता पंढरपूर येथिल अवैध दारू विक्री करणाऱ्या धाब्यांवर व मटक्यावर सोलापूर ग्रामीण पोलिस पथकाने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास धाड टाकून मुद्देमालासह आठ जणांना ताब्यात घेतले आहे
त्यामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून यामध्ये करकंब पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
             जिल्हा पोलिस प्रमुख विरेश प्रभू यांच्या आदेशान्वये ग्रामीण पोलिसांच्या पथकाने करकंब पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या करकंब येथिल बसस्थानक परिसरातील मटका व्यवसायावर धाड टाकून संतोष बाळकृष्ण शिंदे,दिपक जालिंदर ढोबळे,रवी शंकर धोत्रे,महादेव बाबूराव पवार रा सर्वजण करकंब ता पंढरपूर या चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 36 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर आरोपीकडे मटका मालकाबाबत चौकशी केली असता नामदेव उर्फ़  महाराज गोविंद धोत्रे रा टेंभुर्णी असे असल्याचे समजल्याने पाच आरोपी विरुद्ध करकंब पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
       तसेच करकंब गावातील कनकंबा हॉटेल,तनूजा हॉटेल,निसर्ग हॉटेल व हॉटेल अमर या ठिकाणी अवैध रित्या विक्री होत असलेली देशी विदेशी दारुचा 25000 हजार 832 रु किमतीचा दारू साठा जप्त करून आरोपी विष्णु पांडुरंग देशमुख,रमेश नारायण शिंदे,शिवाजी तानाजी गोडसे,रतिलाल पांडुरंग दातीर सर्व रा करकंब यांच्यासह एकूण नऊ आरोपीवर  गुन्हा दाखल करून सुमारे 62 हजार रुपयांची कारवाई करून एक मोटारसायकल,मोबाईल सह आठ जणांना ताब्यात घेतले आहे.
    सदरची कारवाई जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक विरेश प्रभु यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष टीम मधील सपोनि संदीप धांडे,पोलिस नाईक अमृत खेडकर,मिलिंद कांबळे,अंकुश मोरे,पोलिस कॉन्स्टेबल पांडुरंग केंद्रे,सुरेश रामजने,प्रवीण पाटिल,बाळराजे घाडगे,स्वप्नील गायकवाड आदिनी केली आहे.



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


                                                     

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *