👁 10 Views

आकाशगंगेतील ग्रहाला मिळणार भारतीय कन्येचे नाव

प्रकल्प सादर करत भारताचे नाव उंचावले


भारताच्या कन्येचे नाव अवकाशात झळकणार आहे, तेही अवकाशातील एका ग्रहाच्या रुपाने. बंगळुरुमध्ये बारावीमध्ये शिकणाऱ्या साहिथी पिंगाली या तरुणीला हा मान मिळाला आहे. तिने बंगळूरुमधील प्रदूषित तलावांबद्दल नुकतेच एक संशोधन केले. यामध्ये तिने सर्वोत्कृष्ट संशोधन आणि सादरीकरणाचे पारितोषिकही मिळविले. जागतिक स्तरावरील इंटेल इंटरनॅशनल सायन्स अॅंड इंजिनिअरींग फेअरमध्ये तिने आपला हा प्रकल्प सादर करत आपली कामगिरी दाखवून दिली.
या स्पर्धेत विविध विषयांच्या विज्ञान प्रकल्पांची निवड कऱण्यात आली. एकूण २ हजार जणांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. त्यात तिने आघाडीचे स्थान मिळविले. तिने एक मोबाईल अॅप्लिकेशन आणि तलावाचे मॉनिटरिंग करणारे किट बनवले आहे. या दोन्हीमुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. पहिल्या ३ टक्क्यांमध्ये स्थान मिळवलेल्या पिंगाली हिला अमेरिकेतील मॅसॅच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील लिंक्लोन लॅबोरेटरीतर्फे सन्मानित कऱण्यात आले आहे. या संस्थेकडे लहान ग्रहांना नाव देण्याचे अधिकार आहेत.
या स्पर्धेत भारतीयांना एकूण २१ पुरस्कार मिळाले असून, पिंगाली हिने तीन विशेष सन्मान मिळविले आहेत. या स्पर्धेत पृथ्वी आणि पर्यावरण विज्ञान विषयातील दुसरे स्थान मिळवत भारताने आपली शान कायम राखली आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *