👁 10 Views

मुंबईत न्यायालयाच्या आवारात थरार!; आरोपीने साथीदाराला भोसकले

आर्थर रोड तुरुंगातील गँगवॉर न्यायालयापर्यंत पोहोचले

मुंबई सत्र न्यायालयात गुरुवारी थरारक घटना घडली. आर्थर रोड तुरुंगातील गँगवॉरची झलक सत्र न्यायालयाच्या आवारातही दिसून आली. एका आरोपीने दुसऱ्या आरोपीला न्यायालयाच्या आवारातच भोसकल्याची घटना घडली असून या घटनेने न्यायालयाच्या आवारात खळबळ माजली होती.
मुंबई सत्र न्यायालयाच्या जुन्या इमारतीजवळ ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने न्यायालयातील सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे. या कैद्याकडे तीक्ष्ण हत्यार कसे आले असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या आरोपीच्या प्रकृतीविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *