👁 11 Views

मथुराः नदीत कार कोसळून १० भाविक ठार

मथुरा

उत्तर प्रदेशमधील मथुरा जिल्ह्यातील मकेरा परिसरात कार नदीत कोसळून १० भाविकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली.

मेंहदीपूर बालाजी मंदिराचे दर्शन घेवून परतत असताना भाविकांच्या गाडीला हा अपघात झाला. या अपघातात १० भाविकांचा मृत्यू झाला असून ८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून उर्वरित मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक (ग्रामीण) आदित्य शुक्ला यांनी दिली.

हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *