👁 8 Views

राहुल गांधींना ‘पप्पू’ बोलणे कॉंग्रेस नेत्याला पडले महागात

पक्षाकडून निलंबनाची कारवाई

मीरत : राहुल गांधींचा उल्लेख पप्पू करणे कॉंग्रेसच्या एका कार्यकर्त्याला चांगलेच महागात पडल्याचे दिसत आहे. कारण मीरतच्या कॉंग्रेस जिल्हाध्यक्षाला राहुल गांधी यांना पप्पू म्हटल्याने त्यांना पक्षाकडून निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष विनय प्रधान यांनी व्हॉट्‌सऍप ग्रुपवर राहुल गांधींबाबत हे वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
पप्पूने अडाणी, अंबानी आणि माल्ल्याबरोबर हातमिळवणी केली असती पण त्याने तसे केले नाही. पप्पू मंत्री किंवा प्रधानमंत्रीही झाला असता पण हे सगळे नाकारून तो मंदसौरमध्ये जाऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला, असा मेसेज व्हॉट्‌सऍप ग्रुपवर पाठवल्याचा आरोप प्रधान यांच्यावर आहे. प्रधान यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. माझी प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे प्रधान म्हणाले आहेत. तसेच त्या मेसेजचा स्क्रीनशॉट काढून व्हायरल करण्यात आलेला फोटो फोटोशॉप असल्याचेही प्रधान यांचे म्हणणे आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *