भाळवणी, प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसकरवाडी येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. 15 जूनपासून नविन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसकरवाडी येथे पहिल्याच दिवशी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रारंभी सई शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
सर्व विद्यार्थर्यांनी गावातून प्रभात फेरी काढून आपली मूले शाळेत पाठवा अशा घोषणा दिल्या. उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत हातात फुगे व पुष्प देऊन करण्यात आले. उपस्थित पालकांच्या व ग्रामस्थांच्या हस्ते शालेय साहित्य देण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना मिष्टान देऊन मोठ्या उत्साहात सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन केसकर, मुख्याध्यापक वसंत मिस्कर व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमासाठी शिवराम घाणे यांनी परिश्रम घेतले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




