👁 9 Views

चॅम्पियन्स ट्रॉफी 2017: पाकिस्तानविरोधात फायनल मॅचपूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी भारत – पाकिस्तान मॅचपूर्वी टीम इंडियाला झटका

सचिन व्हटे, पंढरपूर लाईव्ह
चॅम्पियन्स ट्रॉफीमधील फायनल मॅचमध्ये टीम इंडिया पाकिस्तान विरोधात भिडणार आहे. हा महामुकाबला पाहण्यासाठी भारत-पाकिस्तानमधीलच नाही तर संपूर्ण जगभरातील क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. मात्र, या फायनल मॅचपूर्वी एक धक्का देणारी बातमी टीम इंडियातून समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याची प्रकृती बिघडली आहे. विराट कोहलीने सेमी फायनल मॅचमध्ये नॉट आऊट 96 रन्सची धडाकेबाज खेळी खेळली होती. यासोबतच वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद 8000 रुन्स बनविणारा बॅट्समनही विराट कोहली बनला.
कोहलीला डोकेदुखीचा त्रास जाणवत आहे. विराटने टीमच्या फिजिओंकडून डोकेदुखीचं औषध घेतलं आहे. ही औषधं घेऊन तो बर्मिंघहमच्या हॉटेलमधून लंडनकडे बसमधून रवाना झाला आहे. प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, विराट कोहलीने आपल्याला डोकेदुखीचा त्रास जाणवत असल्याचं टीमच्या फिजिओंना सांगितलं. त्यानंतर त्याला औषध देण्यात आलं. (हे पण पाहा: चॅम्पिअन्स ट्रॉफी : भारत – पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने, ऋषि कपूरच्या ट्विटवरून गोंधळ)
चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनल मॅच भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन टीम्समध्ये रविवारी ओव्हल मैदानावर खेळवण्यात येणार आहे. अपेक्षा केली जात आहे की, विराट कोहलीची प्रकृती लवकर ठिक व्हावी. जेणेकरुन विराट कोहली रविवारी पाकिस्तान विरोधात होणा-या मॅचमध्ये खेळू शकेल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *