👁 8 Views

जन्मभर सेवा तुझ्या पाऊलांची…

    हैबतबाबाचे मुळ गाव सातारा जिल्ह्य़ातील आरफळ, परंपरागत विठ्ठलाचे वारकरी व ज्ञानोबा माऊलीची सेवा हा घराण्याचा वारसा.
    हैबतबाबा ग्वाल्हेरचे महादजी शिंदे यांचे सरसेनापती होते.अतिशय कुशल कामगीरी युद्धात केल्यामुळे शिंदे सरकारानी हैबतबाबाना बरीच संपत्ति देऊन आपल्या गावी जाण्याची अनुमती दिली. पुढे वाटेत सातपुङ्याच्या पर्वत रागातं बाबांना येतांनीच दरोङेखोराच्या टोळीने गाठले. सर्व संपत्ती हिसकावून बंदी बनविले. बाबा अहोरात्र माऊलीच नामस्मरण करत होते. माऊलीचा धावा केला व माऊली ज्ञानोबारायालाच साकङ घातले. माऊली या संकटातून मज पामराचे जर आपन प्राण वाचविले, तर पुन्हा घरी जाणार नाही. उर्वरित आयुष्य तुमच्या चरणाच्या सेवेतच घालविल. पुढे दैवयोगाने दरोङेखोराच्या टोळी प्रमुखास पुत्र रत्न झाले. तो प्रमुख आपल्या पत्निला सांगू लागला, आपला पुत्र खुप दैववान आहे, जन्माला येताच ईतकी सारी संपत्ति मिळाली आहे. परंतु ज्या वाटसरूला मि लुटले आहे त्याला मी मारून टाकतो. #करील_ते_काय_नोहे_महाराज
  त्या टोळी प्रमुखाची धर्मपत्नी त्यास म्हणाली या आनंदाच्या क्षणी हत्या करू नका आपन त्याना सोङुन द्यावे. धर्मपत्नीचे हे बोल ऐकताच हैबतबाबांना त्यानी जिवदान देऊन सर्व संपत्ती परत दिली. परंतु #वचन_न_मोङी_बोलीले_ते हा वैष्णवी बाणा हैबतबाबांचा ते पुन्हा संसारात रगंण्यासाठी गेलेच नाही. सरळ देवाची आळंदी गाठली.
#येथुनीया_नुठवू_माथा |
#मरणा_वाचुनी_सर्वथा ||
  माऊलीच्या समाधीवर मस्तक ठेवले, विठ्ठल भजनात रंगुन गेले. बाबाचं भजन म्हणजे साक्षात माऊलीची समाधी ङोलायची परंतु आता देखील काही लोकांना भजनाचा त्रास होतो. तसा त्याही काळात हैबतबाबाच्या भजनाचा त्रास होणार्या मंडळीनी बाबांना सिद्धबेटात जाण्यास सांगितले. पंरतु माऊलीनीच त्या सर्वांना स्वप्नदृषातं देऊन सांगितले, माझा भक्त माझ्या जवळच पाहिजे. किती मोठा भाग्याचा उदय आहे. संसारात न रंगता संताकङे गेलेल्या हैबतबाबांना माऊलीनी माझा भक्त म्हणाव. आज आपन ज्या विश्वमाऊली ज्ञानोबाराय आषाढी वारी पालखी सोहळ्यात वारीला येतो त्या पालखी सोहळ्याचे जनकच हैबतबाबा आहेत. आज आषाढी वारीचे वेध लागले कि पवित्र अशा महात्माचं स्मरण अनायासे होतेच.
#मस्तक_हे_पायावरी |
#या_वारकरी_संताच्या ||
#येताय_न_मग_वारीला
#चला_तर_मग
   || जय मुक्ताईं ||
|| ज्ञानोबा तुकाराम ||
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *