👁 9 Views

ऍब्युलन्ससाठी वाहतूक पोलिसाने राष्ट्रपतींचा ताफा रोखला!

बंगळुरु : बंगळुरुच्या त्रिनिटी मंडळात तैनात एका वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने शनिवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा ताफा रोखला असल्याची माहिती समोर येत आहे. ऍम्ब्युलन्सला रस्ता देण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे.
वाहतूक पोलिस उपनिरीक्षक एम.एल.निजलिंगप्पा यांच्या या साहसी कृत्यामुळे त्यांनी नागरिकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. तर दुसरीकडे राज्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही त्यांचा सन्मान केला. त्रिनिटी क्षेत्रात मेट्रो ग्रीन लाईनच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी बंगळुरुमध्ये होते.
राष्ट्रपतींचा ताफा राजभवनच्या दिशेने जात असल्याने वाहतूक रोखण्यात आली होती. पण या ट्रॅफिकमध्ये एक ऍम्ब्युलन्सही अडकली होती. त्यावेळी घटनस्थळी तैनात असलेले वाहतूक पोलिस उप निरीक्षक एम.एल.निजलिंगप्पा यांनी प्रसंगावधान दाखवून राष्ट्रपतींचा ताफा रोखला आणि ऍम्ब्युलन्सला वाट दिली. ट्रॅफिक पोलिसाच्या या कृत्यामुळे बंगळुरुच्या वाहतूक पोलिस पूर्व विभागाचे उपायुक्त अभय गोयल यांनी ट्‌वीट करुन त्यांचे अभिनंदन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *