👁 11 Views

निम्न तापी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात पाच उपसा सिंचन योजना राबविण्यास तत्वत: मान्यता  

– जलसंपदा मंत्री गिरीष महाजन
यांच्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी दिली मंजुरी
– अमळनेर, धरणगाव व चोपडा
तालुक्यातील सुमारे वीस हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ
– तीन वर्षात प्रकल्प पूर्ण
करण्याचे उद्दिष्ट
मुंबई, दि. 20 : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पाडळसे येथील
निम्न तापी प्रकल्पाच्या अवर्षण प्रवण क्षेत्रात सिंचन सुविधा मिळावी, यासाठी
जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून या
प्रकल्पाच्या क्षेत्रात पाच उपसा सिंचन योजना शासकीय खर्चाने राबविण्याच्या सुमारे
621.68 कोटी रुपयाच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत
: मान्यता दिली आहे. यामुळे अमळनेर, धरणगाव व चोपडा
तालुक्यातील सुमारे वीस हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.
            तापी
नदीवर मौजे पाडळसे गावाजवळ निम्न तापी प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे
502.09 दलघमी एवढा पाणी साठा होणार असून 63 हजार 565 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली
येणार आहे. या प्रकल्पाच्या मूळ प्रकल्प अहवालात या प्रकल्पात लाभधारक शेतकऱ्यांनी
वैयक्तिक अथवा सामूहिक पद्धतीने स्वत
:च्या खर्चाने पाणी उपसा करून शेतीसाठी वापरण्याची तरतूद आहे. मात्र
शेतकऱ्यांना स्वखर्चाने पाणी उपसा करणे शक्य नसल्याचे निर्दशनास आल्यानंतर जलसंपदा
मंत्री श्री. महाजन यांनी या प्रकल्पाच्या क्षेत्रात सिंचन सुविधा पुरविण्यासाठी
पाच उपसा सिंचन योजना राबविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. तसेच केंद्रीय
जल आयोगानेही या क्षेत्रात उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी पुरविण्यासाठी मंजुरी दिली
होती.
जलसंपदा मंत्री श्री.
महाजन यांच्या पाठपुराव्यानंतर या पाच उपसा सिंचन योजनेच्या 621.68 कोटी इतक्या
प्रस्तावास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी तत्वत
: मंजुरी दिली असून या योजनांमध्ये ऊर्जा कार्यक्षम  पंप वापरण्याची सूचना केली आहे. या योजनेमुळे
प्रामुख्याने अमळनेर, धरणगाव, चोपडा या अवर्षण प्रवण क्षेत्रातील
20 हजार हेक्टर क्षेत्रास सिंचन सुविधेचा लाभ होणार आहे.
निम्न तापी प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यात येणार असून त्यावेळी या सिंचन
योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.
या पाच सिंचन योजना
पूर्णत
: नलिका वितरण प्रणालीद्वारे
सिंचित करण्यात येणार असून या योजनांसाठी तत्वत
: मान्यता मिळाल्यामुळे आता सर्वेक्षण व इतर अनुषांगिक गोष्टी सुरू करण्यात
वेग येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *