👁 9 Views

देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुणे मॉडेलचा आदर्श घ्यावा – केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू

            केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले कीआज शेअर बाजारात घंटी वाजवून पुणे महापालिकेचा बॉण्ड गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला. या घंटीतून निघालेला नागरी सुधारणेचा प्रतिध्वनी देशभर घुमण्यास मदत होणार आहे. देशातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुणे मॉडेलचा आदर्श घ्यावाअसे आवाहन करुन श्री. नायडू म्हणाले की,शहरे ही विकासाचे इंजिन आहेत. त्यामुळे नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी महापालिकांनी महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घ्यावेत. केंद्र शासनातर्फे देशभरात शहर विकासाकरीता 4.13 लाख कोटी रुपयांचा निधी वितरीत केला जातो. विकास प्रकल्पांना वित्तीय सहाय मिळाल्यावर त्याची गती निश्चितच वाढेल. शहर विकासाचा आराखडा तयार करताना स्थानिक नागरिकांनी त्यात सहभाग दिला पाहिजे. त्याचबरोबर शहरांनी आणि त्याचे व्यवस्थापन पाहणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वत:चा निधी उभारणे आवश्यक आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरांच्या सुधारणांवर भर देण्यात येत आहे. जी शहरे अधिक चांगल्या पद्धतीने विकासाची कामे करतील त्यांना प्रोत्साहन म्हणून 20 टक्के निधी देण्यात येईल.
            केंद्रीय वित्त राज्यमंत्री श्री. मेघवाल म्हणाले की2017 हे वित्तीय सुधारणांचे वर्ष म्हणून ओळखले जाणार आहे. देशातील व्यवहार डिजीटल फ्लॅटफॉर्मवर आले आहे. देशामध्ये 91 लाख नवीन करदात्यांची यामुळे भर पडली आहे.
            श्री. बापट म्हणाले कीनगरविकासाच्या क्षेत्रात पुणे महापालिकेने नवीन विक्रम केला आहे. बॉण्डच्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पुणे देशातील पहिल्या क्रमाकांचे शहर बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी श्रीमती भट्टाचार्य, ‘सेबीचे अध्यक्ष श्री. त्यागीमुंबई शेअर बाजारचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहानपुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांची भाषणे झाली. पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी प्रास्ताविक केले.
            या बॉण्डच्या माध्यमातून 2264 कोटी रुपये पुणे महापालिका उभारणार असून या द्वारे उभारलेल्या निधीतून 24x7 पिण्याचा पाणी पुरवठ्याचा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. पुढील 30 वर्ष पुणेकरांना शुद्धस्वच्छ पाणी यामाध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर रस्तेसांडपाणी प्रकल्पजलवाहिन्या आदी कामे केली जाणार आहे.
            या सोहळ्यास पुणे शहरातील स्थानिक लोकप्रतिनीधीवरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *