पंढरपूर : प्रतिनिधी
जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या पथकाने टाकलेल्या धाडी मध्ये ४८ जणांना जुगार खेळताना ताब्यात घेण्यात आले आहे. २ लाख ८० हजार रुपये रोख आणि २४ मोटार सायकलीसह ४ चारचाकी गाड्या अटक करण्यात आलेल्यांकडून जप्त केल्या आहेत. आषाढीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
रविवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास सांगोला मार्गावर कासेगाव (ता पंढरपूर) हद्दीत बायपास जवळच्या हॉटेल पंचरत्नवर पोलिसांनी धाडक टाकून ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल ३० ते ३५ लाख रूपये किमतीचा असल्याची प्राथमिक माहिती आहे.
याबाबत पोलिस अधिक तपास करित आहेत.




