👁 10 Views

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शैलेश काळे विजयी

पुणे – पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या 2017-18 च्या वार्षिक निवडणुकीत ‘दैनिक आज का आनंद’चे शैलेश काळे अध्यक्षपदी विजयी झाले आहे. सरचिटणीसपदी दिगंबर दराडे तर, उपाध्यक्षपदी हेमंत जाधव आणि सुभाष खुटवड यांची निवड झाली आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघाची रविवारी निवडणूक झाली. 2017-18 या वर्षासाठी झालेल्या या निवडणुकीत खजिनदारपदी विठ्ठल देवकाते, चिटणीसपदी अभिजित बारभाई आणि बेळगावचे सुकृत मोकाशी यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून अॅड. सुभाष किवडे, अॅड. प्रताप परदेशी आणि जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी काम पाहिले.

 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *