👁 12 Views

सोशल मीडिया क्वीन ‘ढिंच्यॅक पूजा’वर पोलिस कारवाई करणार

मुंबई : सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या युझर्ससाठी ढिंच्यॅक पूजा हे नाव नवीन नाही. ‘सेल्फी मैने ले ली आज’नंतर पूजाचा ‘दिलोंका शूटर है मेरा स्कूटर’ हा व्हिडिओ रिलीज झाला. मात्र आता याच गाण्यामुळे ती अडचणीत येण्याची शक्यता आहे.

दिल्ली वाहतूक पोलिस ढिंच्यॅक पूजावर कारवाई करण्याची शक्यता आहे. तिच्या गाण्यामुळे ही कारवाई होणार नसून तिने स्कूटर चालवताना वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे आहे. व्हिडिओत स्कूटर चालवताना हेल्मेट न घातल्यामुळे तिच्यावर कारवाई होणार आहे.
खरं तर दिल्ली पोलिसांनी तिला नियम मोडताना पकडलं नाही. मात्र एका ट्विटर यूझरने दिल्ली पोलिसांना टॅग करुन ढिंच्यॅक पूजाची तक्रार केली.
मोहित सिंह नावाच्या व्यक्तीने पूजाचा हेल्मेट न घालता स्कूटर चालवतानाचा फोटो ट्वीट केला. ‘ही मुलगी विदाऊट हेल्मेट स्कूटर चालवत आहे आणि जोरजोराने गाणी गात आहे’ असं मोहितने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

@dtptraffic @DelhiPolice आपके संदर्भ में ये मोहतरमा बिना हेलमेट स्कूटर चला रही है और ख़ूब शोर करके गाने गा रही है ।
विशेष म्हणजे अवघ्या 8 मिनिटांत पोलिसांनी त्याच्या ट्वीटची दखल घेतली. या घटनेची तारीख, वेळ आणि जागा सांगा, आम्ही योग्य ती कारवाई करु, असा रिप्लाय पोलिसांनी दिला. यावर उत्तरादाखल ’24 जून 2017 रोजी दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी सुरजमल विहार भागात हा प्रकार घडला’ असं मोहितने कळवलं.
@dtptraffic @DelhiPolice आपके संदर्भ में ये मोहतरमा बिना हेलमेट स्कूटर चला रही है और ख़ूब शोर करके गाने गा रही है ।pic.twitter.com/osz56KsSpM
@mohit_news24 @DelhiPolice Thanks,kindly tweet with date,time and exact place so that necessary action can be taken.
@mohit_news24 @DelhiPolice Thanks,kindly tweet with date,time and exact place so that necessary action can be taken.
@dtptraffic @DelhiPolice जहग सूरजमल विहार समय दिन के 3 बजके दस मिनेट दिन 24 जून 2017 धन्यवाद

दिल्ली पोलिस ढिंच्यॅक पूजाविरोधात कोणती कारवाई करणार, हे पाहणं म्हत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सेलिब्रेटी असो वा सामान्य माणूस, पोलिसांनी सर्वांना समान न्याय दिल्याचं पाहून अनेकांना दिलासा मिळाला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *