१८ जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार
( संग्रहीत छायाचित्र )
राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच गुरुवारी निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. १८ जुलैपर्यंत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून आवश्यकता भासल्यास ५ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
विद्यमान उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची कारकिर्द १० ऑगस्टरोजी संपणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसीम झैदी यांनी पत्रकार परिषदेत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी १८ जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. आवश्यकता भासल्यास ५ ऑगस्टरोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकालही जाहीर केला जाईल असे झैदी यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून रामनाथ कोविंद तर काँग्रेसप्रणित यूपीएकडून मीरा कुमार रिंगणात आहे. आता उपराष्ट्रपतीसाठी भाजप कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रामनाथ कोविंद यांना उमेदवारी देत मोदींनी सर्वांनाच धक्का दिला होता. भाजपने दलित उमेदवार दिल्याने काँग्रेसनेही मीरा कुमार यांना रिंगणात उतरवले आहे. या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांना बहुमत मिळण्याची चिन्हे असून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही भाजपचेच पारडे जड आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




