पंढरपूर दि. 30 :- भारतीय चलनात एक, दोन,पाच आणि दहा रुपयांची नाणी कार्यरत असून ही नाणी व नोटा चलनात स्वीकरणे अनिवार्य असल्याची माहिती तहसिलदार, पंढरपूर यांनी दिली.
पंढरपूरात सध्या आषाढी वारीचा सोहळा सुरु झाला आहे. वारी कालावधीत व इतर दिवशी वारकरी-भाविक व नागरिकांकडून चलनातील कार्यरत नाणी स्वीकारली जात नसल्याबाबत तहसिल कार्यालय येथे काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. चलनातील कार्यरत नाणी व नोटा न स्वीकारल्याने जनतेला तसेच वारकरी-भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी व्यापारी, उद्योजक, हॉटेल व्यावसायिक, गॅस वितरक, पेट्रोल-डिझेल पंप चालक-मालक, एस.टी. महामंडळ व नागरिकांनी एक, दोन,पाच आणि दहा रुपयांची नाणी व नोटा स्वीकाराव्यात असे आवाहन तहसिलदार पंढरपूर यांनी केले आहे.
भारतीय चलनात कार्यरत असणारी उपरोक्त किंमतीची नाणी व नोटा न स्वीकारणे हा भा. दं. वि. संहिता कलम 124 (अ) अन्वये दखलपात्र गुन्हा आहे. तरी सर्व संबंधित घटकांनी व नागरिकांनी चलनात कार्यरत असणारी नाणी व नोटा स्वीकाराव्यात असेही, तसहलिदार, पंढरपूर यांनी कळविले आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




