👁 11 Views

GST देशभर लागू

 देशभरात आज 1 जुलैपासून वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी (गुड्स अॅण्ड सर्व्हिस टॅक्स) लागू झाला आहे. यामध्ये खाण्या-पिण्याच्या बहुतांश वस्तू स्वस्त होतील. फळे, भाज्या, डाळी, गहू, तांदूळ हे आधीप्रमाणेच टॅक्स फ्री आहे. तर चिप्स, बिस्किट, तूप, चहापत्ती, कॉफी यासारख्या पदार्थांवर 10 टक्क्यांपर्यंत कर द्यावा लागणार आहे.
खाद्यतेलावर 7 टक्के कर कमी लागेल. तर, घर बांधण्याचे साहित्य जसे की सिमेंट, प्लायबोर्ड आणि टाइल्सवर 8.75 टक्क्यांपर्यंत कर आकारण्यात येणार आहे. परंतु इतर वस्तूवरील कर कमी होईल. divyamarathi.com जीेएसटी बाबत सुरुवातीपासून वाचकांचे नॉलेज सोर्स राहिले आहे. या पॅकेजमधून आम्ही सांगणार आहोत प्रत्येक वस्तूंच्या किंमती, ज्यांचा तुम्ही- आम्ही दैनंदिन जीवनात सर्वाधिक वापर करतो…
अखेर काय आहे GST?
– GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अर्थात वस्तू आणि सेवा कर आहे. केंद्र आणि राज्यांच्या अप्रत्यक्ष करांच्या ऐवजी GST लागू केले जात आहे. हा असा कर आहे जो देशभरातील कोणत्याही वस्तू आणि सेवा यांच्या निर्मिती, विक्री आणि वापरावर लागू होणार आहे. 
– यामुळे उत्पादन शुल्क, सेंट्रल सेल्स टॅक्स, राज्यांचे सेल्स टॅक्स अर्थात व्हॅट, एन्ट्री टॅक्स, लॉटरी टॅक्स, स्टँप ड्यूटी, टेलिकॉम लायसन्स फिस, टर्नओव्हर टॅक्स, विजेच्या वापरावर किंवा विक्री आणि वस्तूंच्या ट्रान्सपोर्टवर लागणारे कर संपूष्टात येणार आहे. 
– जीएसटी हे ‘एक राष्ट्र, एक टॅक्स’ या संकल्पनेवर आधारीत आहे.
सध्या GST कुठे लागू नाही
जीएसटी कायद्याला जम्मू-काश्मीर वगळता सर्व राज्यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर वगळता देशभर जीएसटी लागू होईल.
2006-07 च्या बजेटमध्ये यूपीएकडून पहिल्यांदा उल्लेख
जीएसटीची कल्पना तशी 30 वर्षे जुनी आहे. तथापि, जीएसटीचा पहिला उल्लेख 2003 मध्ये अप्रत्यक्ष करांबाबत केळकर अहवालात झाला होता. 2006-07 च्या अर्थसंकल्पात तत्कालीन यूपीए सरकारने पहिल्यांदा जीएसटीचा प्रस्ताव अंतर्भूत केला होता. यात 1 एप्रिल 2010 पासून देशभरात जीएसटी लागू करण्याचा विचार मांडण्यात आला होता.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *