पासपोर्ट बनवण्यासाठी आजपासून आधार क्रमांक आवश्यक ठरणार आहे. ऑनलाइन रिटर्न भरण्यापासून स्कॉलरशिप मिळण्यासाठी आधार क्रमांक गरजेचा झाला आहे. अनेक सरकारी योजनांचा लाभ 30 सप्टेंबरपर्यंत विनाआधारही मिळणार आहे. केंद्र सरकारने नुकतीच याबाबतची माहिती सुप्रीम कोर्टात दिली. देशातील 85 टक्के नागरिकांकडे सध्या आधार कार्ड आहे.
कोणत्या बाबींसाठी आधार क्रमांक आहे गरजेचा
पॅनशी आधार जोडणे गरजेचे
– पॅन कार्डला आधार कार्डाशी जोडणे आता आवश्यक झाले आहे. ‘सीए’ हिमांशु कुमार यांनी यामुळे सरकार आणि ग्राहक दोघांचाही फायदा होईल असे मत व्यक्त केले आहे. पॅन कार्डमुळे आता केवळ दोन मिनिटात इन्कम टॅक्स रिटर्न ऑनलाइन भरता येणार आहे. काही लोक 2-3 पॅन कार्ड बनवतात आणि करचुकवेगिरी करतात त्याला यामुळे आळा बसणार आहे.
स्कॉलरशिप
– सरकारी शाळा-महाविद्यालयांमध्ये आधार लिंक नसल्यास स्कॉलरशिप मिळणार नाही. यामुळे घोटाळे होऊ शकणार नाहीत. योग्य व्यक्तीपर्यंत लाभ पोहचेल.
रेल्वेचे सवलतीच्या दरातील तिकीट
– रेल्वेचे सवलतीच्या दरातील तिकीट मिळविण्यासाठीही आधार नंबर गरजेचा असणार आहे. यामुळेही योग्य व्यक्तींपर्यंत लाभ पोहचेल.
पीएफ खाते
– प्रॉविडंट फंडाचे (पीएम) खाते आधार क्रमांकाशी जोडणे गरजेचे आहे. यामुळे पीएफ सेटलमेंटची प्रक्रिया सुलभ होणार आहे. पीएफ योग्य व्यक्तीलाच मिळेल.
आधार शिवाय रेशन मिळणार नाही
– रेशन मिळण्यासाठी आता आधार क्रमांक गरजेचा आहे. हरियाणा सरकारचे यामुळे 500 कोटी रुपये वाचतील अशी अपेक्षा आहे. बनावट शिधापत्रिकांद्वारे रेशन हडप करणाऱ्यांना त्यामुळे चाप बसणार आहे.
हेही बदल होत आहेत आजपासून
– परदेशात जाणाऱ्या भारतीयांना एक जुलैपासून विमानतळावर डिपार्चर स्लीप जमा करण्याची गरज पडणार नाही. रस्ता आणि समुद्रामार्गे प्रवास करणाऱ्यांना मात्र ही स्लीप भरावी लागणार आहे.
– ‘सीए’ च्या अभ्यासक्रमातही आजपासून बदल करण्यात आला आहे. आता हा अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय स्तराचा असेल. यात जीएसटीचा देखील समावेश करण्यात आला आहे.
– परदेशात जाणाऱ्या भारतीयांना एक जुलैपासून विमानतळावर डिपार्चर स्लीप जमा करण्याची गरज पडणार नाही. रस्ता आणि समुद्रामार्गे प्रवास करणाऱ्यांना मात्र ही स्लीप भरावी लागणार आहे.
– ‘सीए’ च्या अभ्यासक्रमातही आजपासून बदल करण्यात आला आहे. आता हा अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय स्तराचा असेल. यात जीएसटीचा देखील समावेश करण्यात आला आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




