👁 8 Views

परभणी जिल्ह्यातील धर्मापूरीच्या दिंडीतील वारकरी शोकाकुल… दिंडीच्या पालावर भिंत कोसळल्याने ६५ वर्षीय जेष्ठ वारकरी जागीच ठार..!

पंढरपूर Live
दि.२ जुलै २०१७
पंढरपूर मध्ये परभणी जिल्ह्यातील धर्मापूरीच्या दिंडीतील वारक-यांच्या पालावर पालानजीक असलेले  कंपाउंड ची भिंत  कोसळून घडलेल्या दुर्घटनेत एका जेष्ठ भाविकाचा करूण अंत झाल्याने या दिंडीतील
वारकरी शोकाकुल झाले आहेत.
ही दुर्घटना पंढरीतील नवीन कराड नाक्यानजीक, सातारा रोड, गेंडवस्ती जवळ गट नं ५८, इसबावी आज दु.  तीन  वाजणेच्या सुमारास घडली.  यात रामकिशन माधवराव कराळे (६५), रा. पिंगळी, ता. परभणी जि. परभणी हे जागीच मयत झाले तर मंजुळाबाई दत्तात्रय कुदळे (६०) रा. जिंतुर, ता. परभणी व सुमणाबाई तुकाराम कुदळे (६५) रा. परभणी या दोन महिला भाविक जखमी झाल्या आहेत.
याबाबतची माहिती  पंढरपूर Live चे संपादक भगवान वानखेडे यांना एकाने मोबाईल वर  कळवताचच त्यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांचेशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली.
यानंतर पोलिस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. जखमींवर उपचार चालु आहेत. या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर नगरपरिषदेचे नगर अभियंता दिनेश शास्त्री यांनीही घटनास्थळी भेट देऊन दुर्घटनेबाबत अधिक माहिती घेतली.
या घटनेची खबर.शहर पोलिस ठाणेत दत्तात्रय बबनराव चट्टे, रा. धर्मापूरी, जि. परभणी यांनी दिली आहे. ही दिंडी गेल्या २०- २५ वर्षापासून येथे उतरते. परंतु यावर्षी ही दुर्घटना घडल्याने दिंडीतील वारकरी भाविकावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अधिक तपास एएसआय देडे हे करत आहेत.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *