👁 9 Views

पंढरपूर संस्थानच्या अध्यक्षपदी भोसले

मुंबई : राज्यातील समस्त वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराचा कारभार पाहणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदी कऱ्हाडचे भाजप नेते अतुल भोसले यांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे.

या मंदिर समितीचे प्रशासन चार वर्षांपासून जिल्हा प्रशासनाच्या हाती आहे. जिल्हाधिकारी हे समितीचे सभापती आहेत. समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती ३० जूनच्या आत करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेसंदर्भात दिले होते. एमआयटीचे डॉ. विश्वनाथ कराड, अतुल भोसले, भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी, श्री गहनीनाथ औसेकर महाराज, आदी नावे चर्चेत होती. तथापि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतुल भोसले यांच्या नावाला पसंती दिली आहे. पक्षाला विश्वासात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला गेला. भोसले हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यांचे आजोबा जयवंतराव भोसले हे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक होते. अतुल यांचे वडील डॉ. सुरेश भोसले हे कृष्णा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष तर स्वत: अतुल भोसले हे कऱ्हाडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजचे संचालक आहेत.

राज्य शासनाने शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी भाजपचे नेते सुरेश हावरे यांची नियुक्ती केली होती.

सिद्धी विनायक ट्रस्टचे अध्यक्षपद कोणाला?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरेंद्र राणे हे भाजपची सत्ता येऊन पावणेतीन वर्षे झाली तरी मुंबईतील श्री सिद्धी विनायक ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. भाजप सरकारने नवीन समितीच नेमली नाही. राणे यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ २५ जुलैला संपत आहे. युतीमध्ये ठरल्यानुसार या ट्रस्टचे अध्यक्षपद शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेकडून कोणाच्या नावाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पसंती देतात याबाबत उत्सुकता आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

 
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *