👁 14 Views

श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर किताबाचे मानकरी बीडचे बळीराम बहीरावळ ठरले

पंढरपूर,  दि. 2 जुलै : 56 ते 65 वयोगटातील बीड येथील पै. बळीराम बहीरावळ (वारकरी महावीर), 70 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील वैजापूर येथील श्री. रावसाहेब होण (ज्येष्ठ वारकरी महावीर) तर 16 ते 25 वयोगटातील सुरणवाडी येथील श्री. लक्ष्मण करे (कुमार वारकरी महावीर) हे यंदाच्या श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर किताबाचे मानकरी ठरले.
  मानाचा फेटा, माऊलींची/जगद्गुरुंची प्रतिमा, शाल, स्मृतिचिन्ह, पदक व रोख रक्कम व चांदीची तलवार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, अमरावती, अहमदनगर, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, नाशिक व लातूर येथील 300 पेक्षा अधिक वारकरी मल्लांनी भाग घेतला.
  विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर विकास समिती, पुणे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने  विश्‍वशांती गुरुकुल वाखरी पालखी तळाच्या शेजारी, पंढरपूर येथे वारकरी भाविकभक्तांचेसाठी आषाढी वारीचे औचित्य साधून “श्री समर्थ विष्णूदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा” दि. 2 जुलै 2017 रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या.
  सन्माननीय प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मा. ना. श्री. बबनरावजी पाचपुते, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व श्रीक्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समितीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा.कराड, ज्येष्ठ कृषि तज्ज्ञ रमेश ठाकरे, भारत केसरी पै. दादू चौगुले, हिंद केसरी पै. गणपत आंदळकर, हिंद केसरी पै. दीनानाथ सिंग, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, रूई रामेश्‍वरचे माजी सरपंच श्री. तुळशीराम दा. कराड, प्रगतीशील शेतकरी श्री.काशीराम दा. कराड, लातूर येथील माईर्स एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते विजेत्या मल्लांना पारितोषिके देण्यात आली.
            यावेळी कुस्ती स्पर्धेचे सूत्रसंचालन श्री.किसन बुचडे व श्री. कुशाबा पिंगळे यांनी केले. श्री. शंकरअण्णा पुजारी यांनी या स्पर्धेचे धावते वर्णन केले. तर श्री. विलास कथुरे, श्री. मोहन खोपडे व दत्ता माने यांनी कुस्ती पंच म्हणून काम पाहिले. विश्‍वशांती प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरवात होऊन पसायदानाने सांगता झाली.
विविध वयोगटातील विजेते पुढीलप्रमाणे –
(प्रथम क्रमांक – सुवर्णपदक,  द्वितीय क्रमांक – रौप्य पदक, तृतीय क्रमांक – कांस्यपदक, तसेच, प्रत्येकी भगवी पताका, तलवार व रोख रक्कम पुढे दिल्याप्रमाणे
वयोगट          प्रथम क्रमांक            द्वितीय क्रमांक          तृतीय क्रमांक
16ते 25 वर्षे श्री. लक्ष्मण करे श्री.गोविंद उबाळे श्री.सिकंदर कोडलकर
                   सुरणवाडी माळकोंडा मिरगव्हाण
रक्कम  रु. 3,000/- रु. 2,000/- रु. 1,000/-
26 ते 35 वर्षे  श्री. तानाजी लांडगे श्री.लक्ष्मण नरोळे श्री. गंगाराम काळे
सदाशिवनगर सोलापूर जालना
रक्कम रु. 4,000/- रु. 3,000/- रु. 2,000/-
36 ते 45 वर्षे     श्री.अंकुश भडक श्री. अंकुश घार श्री. गोविंद कुसाळकर
आणवापाडा सांगली उस्मानाबाद
रक्कम रु. 5,000/- रु. 4,000/- रु. 3,000/-
46 ते 55 वर्षे,    श्री.रावसाहेब शिंदे श्री. मारूती खांडेकर श्री.शिवाजी गिनगिणे
श्रीगोंदा नांदेड परभणी
रक्कम रु. 6,000/- रु. 5,000/- रु. 4,000/-
56 ते 65 वर्षे     श्री.बळीराम बहीरावळ श्री.विक्रम नलावडे श्री. दशरथ बोर्‍हाडे
बीड बीड येवला
रक्कम रु. 7,000/- रु. 5,000/- रु. 4,000/-
70 वर्षाच्या पुढे श्री.रावसाहेब होण श्री. सुरेश पाटील श्री.उत्तम किरवले
वैजापूर कोल्हापूर लातूर
रक्कम रु. 5,000/- रु. 3,000/- रु.2,000/-
जनसंपर्क विभाग,
माईर्स एमआयटी, पुणे.
फोटो कॅप्शन –
श्री समर्थ विष्णूदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक देतांना प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड. डावीकडून तुळशीराम दा. कराड, श्रीकांत देशमुख, बबनराव पाचपुते, रमेश ठाकरे व विलास कथुरे आदी.
 विजेते पैलवान  : प्रथम क्रमांक – बळीराम बहीरावळ, द्वितीय क्रमांक – विक्रम नलावडे,
तृतीय क्रमांक – दशरथ बोराडे. 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
 
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *