शहर शिवसेनेच्या वतीने संभाजी शिंदे व सचिन अधटराव यांचा सत्कार
पंढरपूर शहर शिवसेनेच्या वतीने आषाढी एकादशी महासोहळ्या निमित्त पंढरपूर शहर शिवसेना संपर्क कार्यालयासमोर भाविकांना फळे वाटप करण्यात आले.विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीचे नुतन सदस्य संभाजी शिंदे व सचिन अधटराव यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.या वेळी पंढरपूर शहर शिवसेनेच्या वतीने मंदीर समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल संभाजी शिंदे व सचिन अधटराव यांचा हृद सत्कार करण्यात आला.यावेळी शिवसेना शहर प्रमुख संदीप केंदळे,शहर उपप्रमुख अजय व्यवहारे,ओंकार बसवंती,कृष्णा कवडे,भैय्या व्यवहारे,राजू नवले,कुंदन सुरवसे,महादेव वाघमारे आदींसह शहर शिवसेनेचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी इस्लामपूर येथील शिवसैनिक हनुमंत सुर्यवंशी यांनी भाविकांना केळी वाटप करण्यासाठी टेम्पो भरुन केळी देवून सहकार्य केल्याबद्दल त्यांचाही सत्कार शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.
यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीचे नुतन सदस्य संभाजी शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन पंढरपूर शहर शिवसेनेचे कार्यकर्ते शहरातील तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव दक्ष असतात.त्यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे सांगीतले.तर सचिन अधटराव यांनी मी एक सामान्य शिवसैनिक म्हनून काम करीत असताना मला मंदीर समिती सदस्यत्वाची संधी शिवसेनेने दिल्याबद्दल आभार मानले.
शहरातील शहा पेट्रोलपंप नजिक असलेल्या शिवसेनेच्या संपर्क कार्यालयासमोर आयोजीत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे शहर उपप्रमुख अजय व्यवहारे व या परिसरातील शिवैसिनक यांनी विशेष परिश्रम घेतले
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111










