👁 11 Views

तरुणीचं काळीज द्या, करणी काढतो, भोंदूबाबाचा पर्दाफाश

पालघर करणी काढण्यासाठी किराणा दुकान मालकाकडे तरुणीचं काळीज मागणाऱ्या भोंदूबाबांना वाणगाव पोलिसांनी अटक केली आहे. देवनाथ मदारी,विजयनाथ मदारी आणि प्रभूनाथ मदारी अशी या भोंदूबाबांची नावं आहेत. ते गुजरातमधील हिमतनगर जिल्ह्यातील आहेत.
खंबाळेंमधील किराणा दुकान मालक असलेल्या संजय पऱ्हाड यांच्या दुकानात सकाळी अकराच्या सुमारास या तिन्ही भोंदूबाबांनी पाणी पिण्याच्या बहाण्याने प्रवेश केला आणि तुमच्या मागे तुमच्या शत्रूंनी करणी केली असल्याने तुमचा व्यवसाय वाढत नसल्याचं सांगितलं. यासाठी पूजा करावी लागणार असं या तिन्ही बाबांनी पऱ्हाड यांना सांगितलं. त्यानंतर पूजेसाठी सामान म्हणून 2 हजारच्या 5नोटा, 500 च्या 11 नोटा, 100 च्या 11 नोटा आणि 50 च्या 11 नोटा तसेच एक नारळ आणण्यास सांगितले.
पऱ्हाड यांनी त्याप्रमाणे त्यांना पूजेच सामन दिले. पूजा झाल्यावर या भोंदूबाबांनी लाल कपड्यात सोन्याची अंगठी बांधली आणि पऱ्हाड दाम्पत्याला बाहेर अगरबत्ती लावण्यास घराबाहेर जायला सांगितलं.
पऱ्हाड दाम्पत्य बाहेर गेल्याचा फायदा घेऊन या बाबांनी लाल कपडयातील सोन्याची अंगठी काढून घेऊन पुन्हा तो लाल कपडा बांधून ठेवला. पऱ्हाड दाम्पत्य परत आल्यावर बाबांनी त्याला लाल कपडा उद्यापर्यंत उघडू नका, अशी ताकीद दिली. या पूजेसाठी या बाबांनी 4 हजार रुपये आणि संजय यांच्या बायकोचा मोबाईल घेतला.
दुसऱ्या दिवशी सकाळी संजय यांना या बाबांनी फोन करुन तुमची पूजा अपूर्ण राहिली आहे. त्यामुळे पुन्हा पूजा करावी लागेल, अस सांगत या पूजेसाठी एका तरुणीचं काळीज लागणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर संजय यांनी हे शक्य नसून तरुणीचं काळीज आणू शकत नाही, त्यामुळे ही पूजा करायची नाही, असं सांगितलं. 
तुम्हाला शक्य नसल्यास आम्ही तरुणीचं काळीज देतो. आम्हाला लाख रुपये द्या, असा तगादा भोंदूबाबांनी संजयसमोर लावल्याने संजय यांना या बाबांवर संशय आला आणि त्यांनी सगळा प्रकार वाणगाव पोलिसांना सांगितला. त्यानंतर वाणगाव पोलिसांनी सापळा रचून या तिन्ही बाबांना अटक केली.
आरोपींवर 420, 34 गुन्हा दाखल झाला असून डहाणू कोर्टात हजर केली असता या भोंदूबाबांना जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


  


















सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *