👁 10 Views

आमदार नितेश राणे यांना अटक

सिंधुदुर्ग : काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना मालवण पोलिसांनी अटक केली आहे. सहाय्यक मत्स्य आयुक्तांविरोधात केलेल्या मासेफेक आंदोलनप्रकरणी मालवण पोलिसांनी ही कारवाई केली.
नितेश राणे यांच्यासह 24 जणांना मालवण पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या सर्व जणांना थोड्याच वेळात कुडाळ सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मच्छिमारांच्या विविध प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी गेलेले काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी सहाय्यक मत्स्य आयुक्तांवर थेट मासे फेकले होते.
आमदार नितेश राणे यांनी मच्छिमारांच्या प्रश्नांबाबत जाब विचारण्यासाठी सहाय्यक मत्स्य आयुक्त जिल्हा कार्यालय मालवण इथं भेट दिली. यावेळी राणे त्यांच्यासोबत आलेल्या मच्छिमारांनी थेट आयुक्तांच्या टेबलवर माशांची टोपली ओतली.
यावेळी आयुक्तांसोबत चर्चा सुरु असताना, त्यांनी योग्य उत्तरं न दिल्याने चिडलेल्या नितेश राणे यांनी थेट त्यांच्या अंगावर मासे फेकले.
तुम्ही तुमची कामं नीट करत नाहीत, जनतेचे प्रश्न सोडवत नाहीत, पैसे खाता, त्यामुळेच आम्हाला इथं यावं लागतं, असं म्हणत नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना झापलं.

  





















































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

  

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *