👁 12 Views

अनेक यात्रेकरुंचे जीव वाचवणाऱ्या ड्रायव्हर सलीमला सलाम!

वलसाड (गुजरात) : जम्मू काश्मीरमध्ये एका मसिहानं अनेक शिवभक्तांचे प्राण वाचवले आहेत. ज्या ओम ट्रॅव्हल्सच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्या बसच्या चालकानं प्रसंगावधान दाखवून अनेक भाविकांचा जीव वाचवला.
सलीम शेख असं या बस चालकाचं नाव आहे. ते गुजरातमधील वलसाडचे रहिवाशी आहेत.
अमरनाथ रस्त्यावर जात असताना दहशतवाद्यांनी अचानक हल्ला केला. मात्र या परिस्थितीतही सलीम डगमगले नाहीत.
दहशतवाद्यांकडून गोळ्यांचा वर्षाव होत असतानाही ते बस चालवत राहिले आणि प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी पोहचवलं.
त्यांच्या याच धाडसामुळं आज अनेक शिवभक्त सुखरुप आहेत. ही बातमी समजताच शेख परिवाराच्या आनंदाला पारावार उरला नाही, मात्र 7 भाविक गेल्याचं दु:खही त्यांच्या परिवाराला आहे.
गोळीबारातही बस सुसाट पळवली
दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केला, त्यावेळी सलीम यांनी चालाखी दाखवली. सलीम यांनी त्या परिस्थितीतही बस सुसाट पळवली. प्रचंड गोळीबारात त्यांनी बस मिलिट्री कॅम्पपर्यंत आणली.
सलीम यांनी प्रसंगावधान दाखवलं नसतं, तर या हल्ल्याची तीव्रता आणखी वाढली असती.
बसवर गोळीबार झाला, त्यावेळी ती बस अमरनाथ यात्रा करुन परतत होती. त्यावेळीच दहशतवाद्यांनी डाव साधून गोळीबार केला. त्यावेळी सलीम यांनी बस न थांबवता, ती तशीच चालू ठेवली.
ज्या बसवर हल्ला झाला त्या बसमध्ये 56 प्रवासी होते. यापैकी 7 जणांचा मृत्यू झाला, तर 19 जण जखमी झाले आहेत.

  














































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 

अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

  

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *