👁 8 Views

तुळजाभवानी पेड दर्शन सुविधा आजपासून; दिवसाला 50 हजारांनी वाढेल मंदिराचे उत्पन्नन

तुळजाभवानी पेड दर्शन सुविधा आजपासून; दिवसाला 50 हजारांनी वाढेल मंदिराचे उत्पन्नन
 15 Jul.2017

तुळजापूर- कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या पेड दर्शनाची सुविधा शनिवारपासून (दि.१५) सुरू होत आहे. यासाठी मंदिरातील धार्मिक वेळेमध्ये बदल करण्यात आले असून, पेड दर्शनासाठी मंदिर प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. इतिहासात प्रथमच पेड दर्शनाची सुविधा तुळजापूरमध्ये सुरू झाली असून, दरराेज तास पेड दर्शनाची सोय असेल. त्यासाठी अभिषेक पूजेच्या मार्गाचा वापर करण्यात येणार आहे. मंदिर उत्पन्न वाढीसाठी प्रशासनाने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
अनेक अधिकाऱ्यांनी प्रयत्न करूनही जो निर्णय घेता आला नाही, त्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून पंधरा दिवसांत अंमलबजावणी करत जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात नवा इतिहास रचला आहे. तुळजाभवानी मातेच्या पेड दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर संस्थानच्या विश्वस्तांच्या ११ जुलै रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी शनिवारपासून करण्यात येत आहे. यासाठी मंदिर संस्थानने मंदिर कार्यालयाच्या बाहेर माहितीपत्रक लावले आहे. दररोज दुपारी १२ ते वाजेपर्यंत भाविकांसाठी पेड दर्शनाची सुविधा असेल.यासाठी कल्लोळ तीर्थाच्या बाजूला राजे शहाजी महाव्दारला लागून असलेल्या इमारतीत देणगी काऊंटर सुरू येणार आहे. तर पेड दर्शनाची रांग अभिषेक पूजेच्या हॉलमधून राहणार आहे. पेड दर्शनाच्या सुविधेसाठी मंदिर संस्थानने तुळजाभवानी मातेच्या धार्मिक विधिच्या वेळेतही महत्त्वपूर्ण बदल केला अाहे.
दरम्यान, या निर्णयामुळे मंदिर संस्थानच्या उत्पन्नात प्रचंड होणार आहे. दररोज सरासरी ५०० भाविकांनी पेड दर्शनाचा लाभ घेतला तरी १०० रुपयांप्रमाणे मंदिर संस्थानला ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळेल. या सुविधेमुळे पेड दर्शनाच्या दर्शन रांगेकडे भाविकांचा ओढा वाढून धर्मदर्शन, मुखदर्शनाची रांग कमी होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे असले तरी सायंकाळी वाजेनंतर पेड दर्शन सुविधा बंद करून अभिषेक पूजेसाठी हॉल रिकामा करणे जििकरीचे ठरणार आहे.
महिलांसाठी दर्शन व्यवस्था
शहरातील महिलांना दररोज एक तास थेट देवी दर्शनाची सुविधा देण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला. मंगळवार, शुक्रवार, रविवार पौर्णिमेसह गर्दीचा कालावधी वगळता स्थानिक महिलांना सकाळी ते चरणतीर्थ पूजेनंतर दर्शन सुविधा असणार.
धार्मिक वेळेत असा होईल बदल
सकाळची चरणतीर्थ पूजा पहाटे ४.३० वाजता (सध्या वाजता)
सकाळची अभिषेक पूजा-सकाळी ते १० पर्यंत (सध्या ते ११ पर्यंत)
सायंकाळची अभिषेक पूजा- ते पर्यंत (सध्या ते वा.)
प्रक्षाळपूजा- रात्री १० वाजता (सध्या १० वाजता)
गर्दीच्या कालावधीत चरणतीर्थ पूजा पहाटे वाजता
उत्पन्न वाढेल, सुविधाही देऊ
मंदिर प्रशासनाने एेतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मंदिराच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल. १०० रुपयांत प्रतिव्यक्ती दर्शन होणार असल्यामुळे या सुविधेचा अधिकाधिक भाविक लाभ घेतील. उत्पन्नात वाढ झाल्यास भाविकांना मूलभूत सुविधा देणे शक्य होईल.
– दिलीप नाईकवाडी, सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक, मंदिर प्रशासन
पुजारी मंडळाचा पेड दर्शनाला विरोध
श्री तुळजाभवानी मातेच्या पेड दर्शनाची सुविधेसोबतच अभिषेकाच्या दरामध्ये दहापट वाढ केली. निर्णयामुळे भाविकांच्या खर्चातही वाढ होणार आहे. त्यामुळे श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाने या निर्णयाला विरोध केला आहे. मंदिर प्रशासनाने पेड दर्शन सुविधा, अभिषेक वेळेत बदल, पूजेच्या दरात केलेल्या वाढीबद्दल निर्णय घेताना तिन्ही पुजारी मंडळांना, महंतांना विचारात घ्यायला हवे, चर्चेतून समन्वयाने निर्णय घ्यावा, अशी मागणी मंडळाचे प्रभारी अध्यक्ष विपीन शिंदे यांनी केली आहे.

सांगितले.
  














































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *