👁 10 Views

महिला क्रिकेट संघाला पाठिंब्यासाठी अभिनेत्रीने शेअर केला मुलाला स्तनपान करतानाचा फोटो..

महिला क्रिकेट संघाला पाठिंब्यासाठी अभिनेत्रीने शेअर केला मुलाला स्तनपान करतानाचा फोटो
17 Jul 2017

मिताली नाग

अशा पद्धतीने मी माझ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला प्रोत्साहित करत आहे.

‘इस प्यार को क्या नाम दूं’ या मालिकेत बरुण सोबतीच्या आईची म्हणजेच अद्वै सिंग रायजादाची भूमिका साकारणारी अभिनेत्री मिताली नाग हिने महिला क्रिकेट संघाला हटके पद्धतीने पाठिंबा दर्शविला आहे. नुकताच मितालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. या फोटोत तिने भारतीय महिला क्रिकेट संघाची निळ्या रंगाची जर्सी घातली असून, ती मुलगा रुद्रांशला दूध पाजताना दिसते.

भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी ‘ब्लीड ब्ल्यू’चे आवाहन करत असतानाच एक स्त्री काहीही करू शकते मग ते अगदी महिला क्रिकेट संघाला पाठिंबा देणं असो किंवा आपल्या मुलाला दूध पाजणं असो. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय की, ‘तर अशा पद्धतीने मी माझ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला प्रोत्साहित करत आहे. मुलाला दूध पाजण्यापासून ते आपल्या देशाचे आवडत्या खेळात प्रतिनिधित्व करण्यापर्यंत कोणतही काम करण्याची महिलांची क्षमता आहे. सो लेट्स ब्लीड ब्ल्यू टुडे!!’ या कॅप्शनला तिने वूमन क्रिकेट वर्ल्ड कप #womencricketworldcup इंडियन क्रिकेट टीम #indiancricketteam मिताली नाग #mitaalinag प्राउड इंडियन #proudindian आणि स्तनपान #breastfeeding हे हॅशटॅगही दिले आहेत.

झी टिव्ही वाहिनीवरील ‘अफसर बिटिया’ या मालिकेतील कृष्णा पिंटू सिंगच्या भूमिकेमुळे मिताली प्रसिद्धीच्या झोतात आली. या अभिनेत्रीने १० नोव्हेंबरला नागपूर येथे संकल्प परदेशी याच्याशी विवाह केला. या वर्षी तिने जानेवारीत गोंडस मुलाला जन्म दिला. मितालीने ‘अनुदामिनी’, ‘मानो या ना मानो’, ‘सावधान इंडिया’, ‘वॉण्टेड’, ‘तुझसे नाराज नही जिंदगी’ या मालिकांसह काही म्युझिक व्हिडिओंमध्येही काम केलेय.
दरम्यान, भारतीय महिला क्रिकेट संघाने न्यूझिलँडच्या संघाचा १८६ धावांनी पराभव करून उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे. महिला वर्ल्ड कपमधील पुढील सामन्यात भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया संघाशी सामना होणार आहे.

जा
  














































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *