👁 11 Views

प्रथम वर्ष प्रवेशात स्वेरी डिप्लोमा अभियांत्रिकीने देखील घेतली जिल्ह्यात आघाडी पहिल्या फेरीत ४१७ पैकी ३३८ जागांची अलॉटमेंट



पंढरपूर- प्रथम वर्ष डिप्लोमा (पदविका) अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेत पहिल्या फेरीत येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमाइंजिनिअरींग कॉलेजने देखील पदवी अभियांत्रिकीच्या पावलावर पावूल टाकून सोलापूर जिल्ह्यात आघाडी घेतली असून विद्यार्थ्यांनी स्वेरीला पुन्हा एकदा पसंती दिली आहे. पहिल्या फेरीत ४१७ पैकी ३३८ जागा अलॉट झाल्या असून  स्वेरीतील कॅम्पस प्लेसमेंट, शिस्त, वार्षिक परीक्षेचा निकाल आणि विद्यार्थी व विद्यार्थीनींना मिळणारी सोय, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास, उच्च शिक्षित प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांकडे असणारे वैयक्तिक लक्ष याचाच विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा अभ्यास करून स्वेरीला पसंती दिली. यावरून असे स्पष्ट होते कि विद्यार्थी व पालकांनी कोणत्याही आकर्षक गोष्टीला प्राधान्य न देता केवळ गुणवत्तेला प्राधान्य दिलेले दिसून येत आहे.  
               शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करीता दि.०७ जुलै ते ११ जुलै २०१७ दरम्यान पदविका अभियांत्रिकीच्या पहिली फेरीची ऑनलाईन प्रक्रिया (कॅप फर्स्ट राउंड) चालली. त्यातून महाविद्यालय निवडण्याच्या प्रक्रियेत जिल्ह्यातील विद्यार्थ्याबरोबरच जिल्ह्याबाहेरून देखील विद्यार्थ्यांनी स्वेरी डिप्लोमालाच पसंती दिली आहे. शिक्षणाची पद्धत अर्थात ‘पंढरपूर पॅटर्न’लाच विद्यार्थ्यांनी पुन्हा पसंती दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत स्वेरी पदविका अभियांत्रिकीच्या उपलब्ध असणाऱ्या एकूण जागांपैकी ८१.५० टक्के इतक्या जागा भरल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात प्रथम येण्याची परंपरा यंदा देखील कायम राखली. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक नेतृत्वाखाली डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी उच्च शिक्षित प्राध्यापक अहोरात्र परिश्रम घेत असतात. त्यामुळे विद्यार्थी देखील भविष्यात स्वतःचा विकास उत्तमरित्या करू शकतो. एकूणच पहिल्या फेरीत आघाडी मारली असली तरीही आणखी दोन फेऱ्या उरल्या असून दुसरी फेरी येत्या गुरुवारी अर्थात २० जुलै रोजी सुरु होणार आहे. प्रवेश प्रक्रियेला लागणारा कालावधी यामुळे अभ्यासाला मिळणारा वेळ कमी पडतो. त्यामुळे स्वेरीच्या नियोजन समितीने दहावी निकालापूर्वीच सराव वर्ग सुरु केले. याचाच फायदा विद्यार्थ्यांना मिळाला. यामुळे पात्र विद्यार्थ्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून ज्यांना स्वेरीत पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला नाही त्यांनी दुसऱ्या फेरीसाठी प्रयत्न करावा. या बाबत स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले, ‘विद्यार्थी व पालकांनी यंदा देखील नेहमीप्रमाणे स्वेरीच्या डिग्री प्रमाणेच डिप्लोमाच्या शिक्षण पद्धतीवरदेखील विश्वास दर्शविला असून आम्ही त्या विश्वासाला तडा जावू देणार नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला व सर्वांगीण विकासाला प्रथम प्राधान्य देऊ.’ या पदविका अभियांत्रिकी प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी फॅसिलीटेशन सेंटर (क्र.६४३७) चे प्रमुख प्रा. एस.एस.गायकवाड (मोबा.क्र९८९०५६६२८१), डॉ.डी.एस.चौधरी (मोबा.क्र.९८६०१६०४३१)व टोल फ्री क्र.१८०० ३००० ४१३१ यावर संपर्क साधण्याचे आवाहन डिप्लोमा (पॉलिटेक्निक) इंजिनीअरिंगचे प्राचार्य ए.डी.इंगळे यांनी केले आहे.
छायाचित्र –श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपुरचे चिन्ह.

From-
Shri. Santosh  C. Halkude
Pandharpur – 413 304. 
Mob: 9545 55 36 28, 

          9850 24 21 55 .




  














































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *