👁 10 Views

ट्रॅफिक पोलिसांशी हुज्जत महागात पडणार, आता शरीरावर वायफाय कॅमेरा

ट्रॅफिक पोलिसांशी हुज्जत महागात पडणार, आता शरीरावर वायफाय कॅमेरा
19 Jul. 2017

मुंबई : वाहतूक पोलिसांशी बाचाबाची करताना किंवा हुज्जत घालताना यापुढे दहा वेळा विचार करा. कारण लवकरच मुंबईतील सर्व वाहतूक पोलिसांच्या छातीवर वायफाय कॅमेरा लावण्यात येणार आहे. यंत्रणेत पारदर्शकता यावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
नेहमीच्या वॉकी-टॉकी आणि लवाजमाशिवाय पोलिसांना आता हा वायफाय कॅमेराही सोबत बाळगावा लागणार आहे. या कॅमेऱ्यात रस्त्यावरील पोलिसाचं प्रत्येक वाहनचालकांसोबतचं संभाषण रेकॉर्ड केलं जाईल आणि त्याचा पुरावा म्हणून उपयोग होईल.
त्यामुळे एखादा व्यक्ती पोलिसांशी जे काही संभाषण किंवा अरेरावी करेल ती सगळी रेकॉर्ड होऊन कंट्रोल रुमला जाईल. कायदेशीर कारवाईसाठी पुरावा म्हणून रेकॉर्ड केलेली माहिती ग्राह्य धरली जाणार आहे.
सुरुवातीला शहरात 100 कॅमेऱ्यांची चाचणी घेतली जाईल. या कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओ क्लिप एडिट करता येणार नाही, जेणेकरुन छेडछाडीची शक्यता कमी असेल, असं वाहतूक विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.
सध्याच्या घडीला, वाहतूक विभागाकडे हायड्रोलिक व्हॅन असून ज्यात कॅमेरा आणि मेगा फोन आहेत. एखादं वाहन टोईंग करताना त्यावरुन घोषणा केली जाते.
या कॅमेऱ्यामुळे वाहतूक पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा बसेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. मागील वर्षी वाहतूक पोलिस विलास शिंदे यांचा तरुणांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता.

जाहिरात 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




  














































Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *