👁 13 Views

चित्रपट सृष्टीतील सोज्वळ अभिनेत्री हरपली – सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे

मुंबईदि. 19 : मराठी चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांच्या निधनाने मराठी चित्रपट क्षेत्राने सोज्वळ अभिनेत्रीला गमविले आहेअशी प्रतिक्रिया सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.

2013-14 यावर्षीचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार सन्मानित श्रीमती भेंडे यांनी मराठी चित्रपटांसमवेत हिंदी चित्रपट सृष्टीतही आपल्या अभिनयाने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते. दोस्ती या सुपरहिट ठरलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटातून त्यांनी अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या निधनाने जुन्या जमान्यातील एक ज्येष्ठ अभिनेत्रीला चित्रपट सृष्टी मुकली आहेअसेही श्री. तावडे यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

जाहिरात 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




  


































Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *