रामनाथ कोविंद देशाचे १४ वे राष्ट्रपती..!
Pandharpur Live 20 Jul. 2017 16:32
नवी दिल्ली : देशाचे १४ वे राष्ट्रपती राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) उमेदवार रामनाथ कोविंद विजयी झालेत. त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला.
१७ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये रामनाथ कोविंद विजयी झालेत. संसद भवनात आज सकाळपासून मतमोजणी सुरु होती. यामध्ये कोविंद यांना ६५.३४ टक्के मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) उमेदवार मीरा कुमार यांना एकूण ३४.३५ टक्के मते मिळाली.
या निवडणुकीसाठी विविध राज्यांतील ४१२० आमदार आणि ७७६ खासदारांना मतदान करण्याचा अधिकार होता. त्यापैकी ९९ टक्के आमदार-खासदारांनी १७ जुलै रोजी मतदानाचा हक्क बजावला होता.
जाहिरात
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111












