विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स् एमआयटी, पुणे, (भारत) व
श्रीक्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समितीच्या वतीने
‘पवित्र चंद्रभागे’च्या महाआरतीमध्ये सहभागी होण्याचे विनम्र आवाहन!
पुणे, दि.20 जुलैः विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स् एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समितीच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या ‘नमामि चंद्रभागा’ या पर्यावरण सुधार, प्रदूषण नियंत्रण व तीर्थक्षेत्र विकासाच्या उपक्रमाचे स्वागत म्हणून गेल्या वर्षी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला, म्हणजेच गुरुवार, दि. 14 जुलै 2016 रोजी, पंढरपूर येथील चंद्रभागेच्या ‘पुंडलिक घाटावर’ ऐतिहासिक अशा ‘पवित्र चंद्रभागे’च्या महाआरतीचा शुभारंभ करण्यात आला.
भारतीय संस्कृती, परंपरा व तत्त्वज्ञानाला अनुसरून, ज्या पध्दतीने रोज सायंकाळी ‘नमामि गंगे’ या उपक्रमाखाली श्रीक्षेत्र काशी/बनारस येथे गंगामातेची महाआरती केली जाते, त्याचप्रमाणे ‘ज्ञानपंढरी’ म्हणून ओळखल्या जाणार्या पंढरपूर या पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दररोज सायंकाळी 7.15 वाजता माता चंद्रभागेची महाआरती गेल्यावर्षीपासून वारकरी सांप्रदायातील थोर कीर्तनकार, प्रवचनकार, तसेच जागतिक कीर्तीच्या अनेक शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ व भाविकभक्तांच्या शुभहस्ते केली जात आहे.
या कालावधीमध्ये अनेक वारकरी भाविकभक्तांनी व जाणकार व्यक्तींनी आपले परमपूज्य आजी-आजोबा, आई-वडील व इतर नातेवाईकांच्या नावाने, त्यांच्या पुण्यतिथी/पुुण्यस्मरणाच्या दिवशी पंढरपूरच्या भीमा-चंद्रभागेची आरती करण्याची, तसेच त्यांच्या नावे अल्पसा प्रसाद वाटप करण्याची आंतरिक इच्छा/भावना व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील समस्त भाविकभक्तांची, वारकर्यांची ही चंद्रभागेच्या महाआरतीमध्ये सहभागी होण्याची भावना लक्षात घेऊन, विश्व शांती गुरुकुल, वाखरी, पंढरपूरच्या वतीने, ज्यांच्या नांवे व ज्या तारखेला अथवा तिथीला आरती करावयाची आहे, त्यांचे नांव व तारीख नोंदणीची सोय करण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त भाविकभक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स् एमआयटी, पुणे, भारत चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी केले आहे.
पवित्र चंद्रभागेच्या नित्य महाआरतीच्या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावयाचा असेल, तर माईर्स् एमआयटीच्याविश्वशांती गुरूकुल, वाखरी, पंढरपूर येथील श्री.दत्तात्रय बा. बडवे (मो.)- 7775900800 व श्री. नरेंद्र उत्पात (मो.)- 9527632033 यांच्याशी संपर्क साधावा.
जाहिरात
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111











