पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
36 हजार एकर जमीन असणारे उदयनराजे दोन लाखांची खंडणी मागतील का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला.
मुंबई : साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयन राजे यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसनं उदयनराजेंच्या समर्थनात मोहीम सुरु केली आहे. 36 हजार एकर जमीन असणारे उदयनराजे दोन लाखांची खंडणी मागतील का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे.
आव्हाडांचं हेच ट्वीट रिट्वीट करुन त्यावर छत्रपतींना बदनाम करण्याचे कारस्थान महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असं म्हणत काँग्रेसचे खासदार राजीव सातवांनी पाठिंबा दिला आहे.
लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजे भोसलेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाहिरात
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111












