👁 9 Views

दुसऱ्याच हिरोबरोबर रोमान्स करतेय ‘लागिरं..’मधली ‘शीतली’..!!!

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 28 Julay 2017


दुसऱ्याच हिरोबरोबर रोमान्स करतेय ‘लागिरं..’मधली ‘शीतली’, दिसला नवरीचा लूक

 टीव्हीवर सध्या गाजत असलेल्या आघाडीच्या मालिकांपैकी एक म्हणजे ‘लागिरं झालं जी’. या मालिकेमध्ये मुख्य पात्र असलेल्या अजिंक्य आणि शीतल यांच्यात आता प्रेमाचे अंकुर फुटायला लागल्याचे दिसत आहे. पण सध्या शीतल म्हणजेच शीतली दुसऱ्याच हिरोबरोबर रोमान्स करत असल्याचे पाहायला मिळतेय. पण ती दुसऱ्या हिरोबरोबर रोमान्स करतेय ती मालिकेत नव्हे तर तिच्या आगामी चित्रपटात.

शीतलची भूमिका करणारी शिवानी बावकर ‘उंडगा’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. या चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर रिलीज झाला असून, त्यात शिवानीसह इतर कलाकारांचा चांगला अभिनय पाहायला मिळत आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहाता, ग्रामीण भागातील तरुणांची लव्ह स्टोरी आणि त्याला असणारा गावातील विरोध अशी कथा असल्याचे लक्षात येते. शिवानी बरोबरच या चित्रपटात चिण्मय संत आणि स्वप्निल कणसे या दोघांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. सोशल मीडियावर सध्या चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर व्हायरल होत आहेत.







पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111












  





Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *