👁 9 Views

युटोपियन शुगर्स चे ऊस उत्पादक जयसिंग भुसनर यांचा भारतीय शुगर्स कडून आदर्श ऊस उत्पादक पुरस्काराने सन्मान

   पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 2 August 2017


मंगळवेढा प्रतिनिधी 
               युटोपियन शुगर्स ने ऊस उत्पादकांसाठी सातत्याने नवनवीन योजना राबवून ऊस उत्पादकांकडून  प्रति एकरी ऊस उत्पादकता वाढावी यासाठी प्रयत्न केले आहेत . ऊस उत्पादनवाडीसाठी व ऊस तंत्रज्ञान प्रचार -प्रसार कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल युटोपियनचे ऊस उत्पादक जयसिंग दाजी भुसनर रा . शिरढोण तालुका पंढरपूर यांना भारतीय शुगर्स कडून राज्यतरावरचा ‘भारतीय शुगर आदर्श ऊस उत्पादक पुरस्कार २०१७’ या राज्यतरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे . 
               शनिवार दिनांक २९ जुलै २०१७ रोजी राजश्री शाहू सांस्कृतिक मंदिर मार्केट यार्ड कोल्हापूर येथे सदरचा पुरस्कार भारतीय शुगर्सचे संस्थापक अध्यक्ष विक्रमसिह शिंदे  यांचे शुभहस्ते  वितरित करण्यात आला. या पुरस्कारा बद्दल  युटोपियन चे मार्गदर्शक व जिल्ह्याचे आमदार मा .प्रशांतराव परिचारक ,संस्थापक चेअरमन उमेशराव परिचारक व कारखान्याचे  कार्यकारी  संचालक मा. उत्तमराव पाटील  यांनी जयसिंग  भुसनर यांचे अभिनंदन केले . 
         सदरच्या पुरस्कारा बद्दल सर्व स्तरातून युटोपियन च्या कार्य प्रणालीचा व आदर्श ऊस उत्पादक पुरस्कार विजेते जयसिंग दाजी भुसनर यांचा गौरव होत आहे 

फोटो ओळी : भारतीय शुगर कडून दिला जाणारा   भारतीय शुगर आदर्श ऊस उत्पादक पुरस्कार २०१७ हा  राज्यतरीय पुरस्कार भारतीय शुगर्सचे संस्थापक अध्यक्ष विक्रमसिह शिंदे  यांचे शुभहस्ते  स्वीकारताना जयसिंग  भुसनर  व उपस्थित उत्पादक  व पदाधिकारी दिसत आहेत 

………………………………………………………………………………………………………………………

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *