पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 3 August 2017
श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस महादेवाला समर्पित आहे. धर्म शास्त्रानुसार श्रावण शुक्ल एकादशी आज आहे. या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. या एकादशीला पुत्रदा एकादशी का म्हणतात यामागे एक प्राचीन कथा आहे.
पुत्रदा एकादशीची कथा जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा…
द्वापार युगाच्या प्रारंभीचा काळ होता. महिष्मतीपुरच्या महिजीत राजास संतती नसल्याने त्याचे राज्य त्यांला सुखद वाटत नव्हते. स्वतःची बिकट अवस्था पाहून त्यांना खूप चिंता वाटू लागली. एकदा ते प्रेजेला म्हणाले…
प्रजाजनहो! या जन्मात माझ्याकडून कोणतेही पापकर्म झालेले नाही. मी राजकोषात केवळ न्यायोपार्जीत धनच गोळा केले आहे. ब्राह्मण आणि देवतांचे धनदेखील मी कधी घेतले नाही. प्रजेचे पुत्रवत पालन केले आहे. धर्माचरणाने पृथ्वीवर राज्य केले आहे. विद्वान लोकांचा सदैव सन्मान केला आहे. मग कोणत्या कारणामुळे मला आजपर्यंत संतती झाली नाही? यावर तुम्ही विचार करावा…
राजाचे हे उद्गार ऐकून प्रजाजन, ब्राह्मण व पुरोहित राजाच्या हिताचा विचार करून घनदाट जंगलात गेले. जंगलात फिरताना त्यांना मुनिश्रेष्ठ लोमश मुनींचे दर्शन झाले.
लोमश मुनी धर्माचे तत्वज्ञ, सर्व शास्त्रांमध्ये पारंगत, दीर्घायुषी आणि महात्मा होते. ते ब्रह्मदेवासमान तेजस्वी होते. त्यांच्या शरीरावर लव होती. एकेक कल्प पूर्ण झाल्यावर त्यांच्या शरीरावरील लव भंगतो, तुटून पडतो, म्हणून त्यांचे नाव ‘लोमश’ पडले. लोमश मुनी त्रिकालज्ञानी होते. त्यांना भेटून सर्वांना खूप आनंद झाला. आपल्या राजाची सर्व हाकीकात त्यांनी लोमेश मुनींना सांगितली. आणि त्यांनी लोमेश मुनीला विनंती केली की, महाराज आम्हाला असा उपदेश द्यावा जेणेकरून राजाला पुत्रप्राप्ती होईल.
हे ऐकून लोमेश महर्षी दोन घटिका ध्यानमग्न झाले. त्यानंतर राजाच्या पूर्वजन्माचा वृतांत जाणून ते म्हणाले : प्रजाजनहो! ऐका, महिजीत राजा पूर्वजन्मी लोकांचे शोषण करणारा एक निर्धन वैश्य होता. तो वैश्य गावोगावी फिरून व्यापार करीत असे.
एके दिवशी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमीला दुपारी सूर्य तळपत असताना तो एका गावाच्या सीमेजवळील विहिरीत पोहचला. पाण्याने भरलेली पाय-यांची विहीर पाहून त्याने पाणी पिण्याचा विचार केला. एवढ्यात तिथे वासरासह एक गायसुद्धा आली. ती ताहनेने व्याकूळ झाली होती. गाय विहिरीत उतरून पाणी पिऊ लागली. वैश्याने पाणी पीत असलेल्या गाईला हाकलले आणि स्वतः पाणी पिऊ लागला. याच पापकर्मामुळे राजा या जन्मी निपुत्रिक आहे आणि त्याही पूर्वीच्या एका जन्मातील पुण्याईमुळे राजाला या जन्मी निष्कंटक राज्य मिळाले आहे.
प्रजाजन म्हणाले : मुनीश्वर, पुराणांमध्ये उल्लेख येतो की, प्रायश्चित्तरुपी पुण्यामुळे पाप नष्ट होतात. म्हणून अशा एखाद्या पुण्यकर्माचा उपदेश द्यावा, जेणेकरून त्या पापाचा नाश होईल.
लोमेश मुनी म्हणाले : प्रजाजनहो! श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात जी एकादशी येते, ती ‘पुत्रदा’ नावाने प्रसिद्ध असून इच्छित फळ देणारी आहे. तुम्ही तिचे विधिवत व्रत करा.
हे एकून प्रजाजनांनी मुनींना नमस्कार केला आणि नगरात येऊन विधिवत पुत्रदा एकादशीचे व्रत राजाला सांगिलते. एकादशीचे व्रत केल्याने राणी गर्भवती झाली. कालांतराने तिने एका सुदृढ पुत्रास जन्म दिला. या एकादशीचे माहात्म्य ऐकून मनुष्य सर्व पापांतून मुक्त होतो आणि इहलोकी सुखी होऊन परलोकी स्वर्गीय गतीस प्राप्त होतो.
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





