👁 6 Views

मराठा जिल्हा परिषद सदस्यांनी आखली मुंबईतील महामोर्चाची रणनीती

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..

पंढरपूर Live 3 August 2017


मराठा जिल्हा परिषद सदस्यांनी आखली मुंबईतील महामोर्चाची रणनीती
औरंगाबाद- मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी ९ ऑगस्ट रोजी मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी महानगर ते गावपातळीवर नियोजन केले जात असून त्यात जिल्हा परिषद सदस्यही मागे नाहीत. त्यांनी बुधवारी जिल्हा परिषदेत बैठक घेऊन रणनीती आखली. आपापल्या गटातील काही मराठा बांधवांची ने-आण करणे, प्रचार- प्रसार करणे आदी जबाबदारी उचलली आहे.
पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते सर्व गट- तट विसरून महामोर्चाची तयारी करत आहेत. यात मराठा लोकप्रतिनिधींनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यानुसार काही मराठा आमदारांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत बैठक घेऊन आपले दायित्व स्वीकारले आहे. जिल्हा परिषद सदस्यांनींही जबाबदारी उचलावी. यासाठी २ ऑगस्ट रोजी बैठक घेण्यात आली. प्रथम कृष्णा पाटील डोणगावकर, अप्पासाहेब कुढेकर, मनोज गायके पाटील, किशोर बलांडे, अविनाश गलांडे, उपाध्यक्ष केशवराव तायडे यांनी मुंबई मोर्चाच्या तयारीबाबत सर्व सदस्यांना माहिती दिली. या बैठकीस अॅड. देवयानी डोणगावकर, श्रीराम महाजन, विलास भुमरे, किशोर पवार, अशोक गरूड, ज्ञानेश्वर मोटे उपस्थित होते.
आमदारांना दिले जाणार पत्र
सध्याअधिवेशन सत्र सुरू आहे. प्रत्येक मराठा आमदाराने मराठा समाजाचे लक्षवेधी प्रश्न अधिवेशनात आवर्जून मांडावेत. त्याचे सरकारकडून उत्तर घ्यावे. ठोस निर्णय घेण्यास भाग पाडावे, अन्यथा राजीनाम द्यावा, असे खरमरीत पत्र आमदारांना घरपोच देण्याचा निर्णयदेखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी उद्यापासून केली जाणार असल्याचे सूत्राने कळवले आहे.

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *