👁 7 Views

आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकास मंजुरी…. महर्षी वाल्मकी संघाच्या पाठपुराव्याला यश!

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..

पंढरपूर Live 3 August 2017

पंढरपूर (प्रतिनिधी):- आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांना पंढरीत चंद्रभागेच्या पात्रात ज्या ठिकाणावरुन इंग्रजांनी अटक केली होती. त्या ठिकाणी त्यांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे. अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून येथील महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने करण्यात येत होती. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वारंवार निवेदने देऊन हे स्मारक होण्यासंबंधीची आवश्यकता त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. महर्षी वाल्मिकी संघाच्या या पाठपुराव्यास यश आले असून मुख्यमंत्र्यांनी या स्मारक उभारणीस हिरवा कंदील दाखवला आहे. अशी माहिती महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
नुकतेच याबाबतचे पत्र मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्हाधिकार्‍यांना पाठवले असून जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन अधिकार्‍यांनी पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकार्‍यांना या स्मारक उभारणीबाबतचा शासन निर्णय कळवला असून चंद्रभागेच्या पात्रात आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे राष्ट्रीय स्मारक बांधणेबाबत प्रस्ताव तयार करुन विहीत कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे निर्देश मुख्याधिकार्‍यांना दिले आहेत.
एकुणच या स्मारक उभारण्यासाठीचा मार्ग आता खुला झाला असून लवकरच चंद्रभागेच्या पात्रात भव्य अशा आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे राष्ट्रीय स्मारकाची उभारणी होणार असल्याने समस्त कोळी महादेव जमात बंधु-भगिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे.
आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे हे चंद्रभागेच्या पात्रात वारकर्‍यांना, पंढरपूरकरांना व कोळी महादेव जमातीच्या बांधवांना इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुध्द लढा देण्यास सज्ज व्हा..! असे सांगून इंग्रजांच्या विरुध्द क्रांतीची मशाल पेटवण्याचे कार्य करत असतानाच 2 जानेवारी 1848 मध्ये इंग्रजांनी त्यांना चंद्रभागेच्या पात्रातून अटक केली. पुढे 2 मे 1848 रोजी ठाणे येथे त्यांना फासावर चढवण्यात आले. आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांनी 1826 मध्ये क्रांतीच्या लढ्यात सहभाग घेतला. 1827 मध्ये त्यांनी क्रांतीची प्रतिज्ञा घेतली. इंग्रज सत्तेच्या विरोधातील  1828 च्या उग्र उठावात तसेच 1830, रतनगड उठाव 1838, जुन्नरचा उठाव 1845 आदी लढ्यात त्यांचा अग्रभागी सहभाग होता. त्यांना पकडून देणारास इंग्रजांनी बक्षीसही जाहीर केले होते. त्यांना फाशी दिल्यानंतर क्रांतीचा लढा देशात अधिकच तीव्र झाला. याचे प्रत्यंतर 1857 चा उठाव झाला. क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके हे राघोजी भांगरेंना गुरुस्थानी मानत होते. 

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *