पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 5 August 2017
‘हम आपके हैं कौन’ ला झाली 23 वर्षे : एवढ्या वर्षांनंतर आता काय करताहेत यातील कलाकार? 2 कलाकार नाहीत या जगात.. बघा फोटोसह रिपोर्ट..!
5 ऑगस्ट 1994 रोजी ‘हम आपके है कौन’ हा ब्लॉकबस्टर सिनेमा रिलीज झाला होता. आज या सिनेमाच्या रिलीजला आज 23 वर्षे पूर्ण झाली आहेत. फॅमिली ड्रामा असलेल्या या सिनेमाने त्यावेळी यशाचे सर्व रेकॉर्ड मोडित काढले होते. शंभर कोटींची कमाई करणारा हा बॉलिवूडचा पहिला सिनेमा ठरला होता.
राजश्री बॅनरच्या या सिनेमामुळे सलमान खान आणि माधुरी दीक्षितचे करिअर यशोशिखरावर पोहोचले. भारतीय मुल्य, परंपरा, रोमान्स आणि संस्कारांचे मिश्रण असलेला हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटाच्या रिलीजनंतर तब्बल 21 वर्षांनी सलमान आणि सूरज बडजात्या राजश्री बॅनरच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या सिनेमातून एकत्र आले होते.
चला जाणून घेऊया, सिनेमाची स्टारकास्ट आता म्हणजे 23 वर्षांनंतर काय करत आहेत…
आता या जगात नाहीत लक्ष्मीकांत बेर्डे आणि रिमा लागू
या चित्रपटात लक्ष्मीकांत बर्डे आणि रिमा लागू या मराठी कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका वठवल्या होत्या. आज हे दोन्ही मोठे कलाकार या जगात नाहीत. 16 डिसेंबर 2004 रोजी लक्ष्मीकांत यांचे निधन झाले. तर याचवर्षी रिमा लागू यांचे 18 मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली.
रेणुका शहाणे
या सिनेमानंतर अभिनेत्री रेणुका शहाणे जणू घराघरांतील फेव्हरेट सून बनल्या होत्या. त्यांनी या सिनेमात सलमानच्या वहिनीची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या सिनेमानंतर रेणुका यांनी काही बॉलिवूड सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केला. काही वर्षांपूर्वी त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रिटा’ या सिनेमाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले होते. रेणुका आता 50 वर्षांच्या आहेत.
प्रिया बेर्डे
सिनेमात चमेलीची भूमिका प्रिया बेर्डेने साकारली होती. प्रिया बेर्डे या मराठी इंडस्ट्रीतील ख्यातनाम अभिनेत्री आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे त्यांचे पती होते. त्यांना स्वानंदी आणि अभिनय ही दोन मुले आहेत.
सलमान खान
या सिनेमात प्रेम नावाच्या साध्यासरळ तरुणाची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता सलमान खान आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. सलमानच्या गेल्यावर्षीरिलीज झालेल्या ‘बजरंगी भाईजान’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पाचशे कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला आहे. तर यावर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेला बजरंगी भाईजान हा सिनेमा मात्र आपटला. सध्या सलमान आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे.
माधुरी दीक्षित
आपल्या अदा आणि ठुमक्यांनी लाखो मनांवर राज्य करणारी माधुरी दीक्षित आजही प्रेक्षकांची फेव्हरेट अभिनेत्री आहे. ‘गुलाब गँग’ (2014) हा तिचा सिनेमा रिलीज झाला होता. सध्या माधुरी जाहिरातींमध्ये दिसत असते.
मोहनीश बहल
आदर्श मुलगा, भाऊ, पतीच्या भूमिकेत हिट झालेला मोहनीश बहल आजही सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये कार्यरत आहे.
हिमानी शिवपुरी
सिनेमात चाची जानची भूमिका वठवणा-या हिमानी शिवपुरी यांनी अनेक सिनेमे आणि टीव्ही शोज केले आहेत. कॅरेक्टर रोल्ससाठी त्यांना ओळखले जाते. कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत. छोट्या पडद्यावर ससुराल सिमर का, डॉलर बहू या मालिकांमध्येही त्यांनी काम केले आहे. सध्या त्या फिल्म्सच्या ऑफर्स नाकारत असून छोट्या पडदयाकडे लक्ष देत आहेत.
अनुपम खेर
गमतीशीर अंदाज आणि मनमौजी स्वभावाच्या प्रतिमेत झळकलेले अभिनेते अनुपम खेर सिनेमाच्या रिलीजच्या 23 वर्षांनंतरही फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत.
बिंदू
70च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्री राहिलेल्या बिंदू यांनी ‘हम आपके है कौन’ या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. ‘ओम शांती ओम’, ‘मैं हू ना’ या सिनेमांमधील त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या. 65 वर्षीय बिंदू आता आपल्या कुटुंबासोबत सुखी आयुष्य जगत असून नव-याला बिझनेसमध्ये मदत करतात.
सतीश शाह
शायरी ऐकवणा-या मामाच्या भूमिकेत झळकलेल्या सतीश शाह यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. सैफ अली खान स्टारर ‘हमशकल्स’ या सिनेमात झळकले होते.
साहिला चड्ढा
सिनेमात रिटा हे पात्र साहिलाने साकारले होते. ‘हम आपके है कौन’ सोबतच ‘वन टू का फोर’ या सिनेमात ती छोटेखानी भूमिकेत झळकली होती. निमल बाली या अभिनेत्यासोबत तिचे लग्न झाले असून त्यांना एक मुलगी आहे.
दिलीप जोशी
1994 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात दिलीप जोशी झळकले होते. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या गाजत असलेल्या मालिकेत ते जेठालालच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांनी काही निवडक सिनेमांमध्येच काम केले आहे.
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
















