👁 10 Views

दादा कोंडके यांना करायचे होते उषा चव्हाण यांचेशी लग्न..! नकार दिल्यावर “एकटा जीव..सदाशिव” मध्ये दादांनी लिहीले असे काही..!!

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..

पंढरपूर Live 8  August 2017


दादा कोंडके यांना करायचे होते उषा चव्हाण यांचेशी लग्न..! नकार दिल्यावर “एकटा जीव..सदाशिव” मध्ये दादांनी लिहीले असे काही..!!

मुंबई – दिवंगत अभिनेते दादा कोंडके जर आज आपल्यात असते तर आज त्यांचा 85 वा वाढदिवस त्यांनी साजरा केला असता. दादा कोंडके केवळ अभिनेतेच नाही तर चित्रपट निर्मातेही होते. सत्तरीचा आणि ऐशींच्या दशकात त्यांचे मराठी सिनेमे तुफान गाजले आणि ते त्याकाळी मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार होते. त्यांच्या चित्रपटात हमखास मिळणारा एक चेहरा होता तो म्हणजे, उषा चव्हाण.
दादा कोंडके यांच्या अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या उषा आज चित्रपटांपासून दूर आहेत. दादा कोंडके यांच्या त्या आवडत्या अभिनेत्री होत्या इतकेच नाही तर दादा कोंडके यांना उषा यांच्याशी लग्नही करायचे होते. पण उषा यांनी यांस नकार दिल्यानंतर सूड घेण्यासाठी बायोग्राफीमध्ये उषा यांच्याविषयी अनेक वाईट गोष्टी लिहील्या. उषा यांनी स्वतः या गोष्टीचा खुलासा ६ ते ७ वर्षांपूर्वी त्यांच्या ब्लॉगवर केला आहे.
अशी होती उषा चव्हाण आणि दादा कोंडके यांची पहिली भेट..
दादा कोंडके यांना त्यांच्या ‘सोंगाड्या’ या चित्रपटासाठी अभिनेत्रीची गरज होती. त्यावेळी सातारा बसस्थानकाजवळ दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांची पहिली भेट झाली होती. तेव्हा दादांनी उषा यांची निवड केली आणि त्यांना पहिला ब्रेक मिळाला. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस होता, असे उषा म्हणतात.
पुढच्या स्लाईडवर वाचा कोण होत्या उषा चव्हाण आणि कोणते धक्कादायक खुलासे केले..

अभिनेत्री उषा चव्हाण आणि दादा कोंडके यांनी अनेक चित्रपटात सोबत काम केले होते. यादरम्यान दादा कोंडकेंनी उषा यांच्याजवळ लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती पण उषा यांनी नकार दिल्यावर दादा कोंडके यांनी ‘एकटा जीव’ या पुस्तकात त्यांच्याबद्दल बरेवाईट छापले होते, असे उषा चव्हाण यांनी त्यांच्या एका ब्लॉगमध्ये सांगितले आहे.


या पुस्तकात केवळ उषा चव्हाणच नाही तर इतर मराठी कलाकारांचीही बदनामी होईल अशा गोष्टी लिहील्या होत्या. हे पुस्तक प्रकाशित होणे आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता, असे उषा चव्हाण यांनी ब्लॉगमध्ये लिहीले आहे.


दादा कोंडके यांच्या मृत्यूनंतर एका वर्षांनी ‘एकटा जीव’ पुस्तक प्रकाशित झाले. खुद्द दादा कोंडकेंनाही हे पुस्तक प्रदर्शित होऊ नये अशी इच्छा होती.


उषा चव्हाण यांनी लिहीले आहे की, दादा कोंडके यांच्या मृत्यूनंतर एक वर्षांनी ट्रस्टी गजानन शिर्के यांचाही मृत्यू झाला. शिर्के यांनी स्पष्ट शह्दात हे पुस्तक प्रकाशित होऊ नये असे सांगितले होते. पण दुर्दैवाने ते प्रकाशित झाले. यानंतर या पुस्तकाविरोधात कोर्टात केस दाखल करण्यात आली आणि यात आमचा विजय झाला. आता या पुस्तकाच्या प्रकाशनावर बंदी आणण्यात आली आहे.


दादा कोंडके यांच्या संपत्तीवरही हक्क गाजवण्याचा आरोप उषा यांच्यावर करण्यात आला होता. पण खुद्द दादा यांनी त्यांच्या खडकवासला येथील स्टुडिओच्या पाच ट्रस्टीपैकी एक म्हणून उषा चव्हाण यांचे नाव मृत्यूपत्रात लिहीले होते. पण दादांच्या कुटुंबाकडून त्यांना फार मनस्ताप सहन करावा लागला असे उषा यांनी लिहीले आहे.


उषा चव्हाण आणि दादा कोंडके यांच्या वयामध्ये जवळपास 23-24 वर्षाचे अंतर होते तरीही प्रेक्षकांनी दोघांची जोडी डोक्यावर घेतली होती.


उषा चव्हाण केवळ अभिनेत्रीच नाही तर मराठी चित्रपटसृष्टीत उत्तम नृत्यांगनाही होत्या. त्यांनी मराठी चित्रपटात अनेक उत्तम डान्स परफॉर्मन्स दिले होते. विशेष म्हणजे उषा चव्हाण ह्या अभिनेत्री जयश्री गडकर यांच्या अनेक लावणींमध्ये बॅकस्टेज डान्सर म्हणून काम केले आहे.


अभिनय, सौंदर्य आणि नृत्य या जोरावर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचे अढळ असे स्थान निर्माण केले.


उषा या गायिकाही होत्या. त्यांनी मराठी चित्रपट ‘मुक्काम पोस्ट ढेबेवाडी’ यात ‘हिरव्या माडीचा जीना अवघड’ हे गाणे गायले आहे.


उषा यांनी ‘गौराचा नवरा’ आणि ‘धरपकड’ या चित्रपटांची निर्मिती अनुक्रमे 1990 आणि 1993 साली केली होती.


उषा चव्हाण यांनी वयाच्या केवळ 16 व्या वर्षापासून चित्रपटांत काम करायला सुरुवात केली होती. आर्थिक अडचणीमुळे त्या या क्षेत्रात आल्या होत्या.


उषा चव्हाण सध्या पुणे येथे राहतात. पती, दोन मुले असा त्यांचे कुटुंब आहे.


उषा यांनी पुणे येथे ‘उषा पॅलेस’ नावाचा एक हॉल बांधला आहे. येथे अनेक कार्यक्रम पार पाडले जातात.


उषा चव्हाण यांच्याबद्दल अनेक वाईट बातम्या मराठी चित्रपटसृष्टीत पसरवल्या गेल्याने उषा यांनी गेल्या अनेक वर्षात कोणत्याच प्रकारच्या सिनेमाशी संबंधित सार्वजनिक कार्यक्रमांना येण्याचे टाळले आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *