पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 9 August 2017
संभाव्य धोका लक्षात घेवुन कार्यवाहीची गरज *
पंढरपूर येथील यमाई ट्रॅक (यशवंतराव चव्हाण तलाव) हा निसर्गरम्य परिसर हा पंढरपूरकरांच्या द्रष्टीने एक अभिमानाचा विषय झालेला आहे.रोज हजारोंच्या संख्येने अबालवृध्द,महिलाभगिणी तसेच व्यायामाच्या हेतूनेही अनेक नागरिक रोज सकाळी-संध्याकाळी या ट्रॅकवर गदी करत असतात. मात्र काही समाजविघातक प्रवृत्ती या ट्रॅकचा गैरवापरही करीत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे या ट्रॅकच्या दोन्ही बाजुच्या प्रवेशद्वारावर अद्यावत सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसवावेत अशी मागणी आदिम विकास परिषदेच्या वतीने पंढरपूर नगर पालीकेचे उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे..या निवेदनाच्या प्रती पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पिंगळे व शहर पोलीस निरिक्षक विठ्ठल दबडे यांनाही देण्यात आल्या आहेत.
या बाबत अधिक माहीती देताना आदिम विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश अधटराव म्हणाले की,यमाई ट्रॅकच्या परीसतरात काही विघातक प्रवृत्तीचे इसम बसून दारु पिणे,अश्लिल चाळे करणे असे प्रकार घडत आहेत.त्यामुळे महिला वर्गातून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.सकाळी नऊ नंतर या ट्रॅकच्या परिसरात अनेक महाविद्यालयीन तरुण-तरुणी येवून अश्लिल चाळे करीत असलेले निदर्शनास येत आहे. या परिसरात दिवसभर वर्दळ नसल्याचा फायदा उठवीत गैरवापर केलाा जात आहे.त्याच वेळी काही गुंडप्रवृत्तीचे तरुणही दिवसभर या ट्रॅकच्या परिसरात येवून येथे आलेल्या मुलींची छेडछाड करीत असल्याचे निदर्शनास येते.मात्र आपण या ठिकानी आलो आहोत याची वाच्यता होईल म्हणून तक्रार करण्यास टाळाटाळ केली जाते.यायाच फायदा काही कुप्रवृृृत्तीचे लोक उचलताना दिसून येतात त्या मुळे या ट्रॅकच्या दोन्ही बाजुच्या प्रवेशद्वारावर सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसवावेत जेणेकरुन उद्या काही दुर्घटना झाल्यास कारवाई करणे सोपे जाईल.तरी आपण याची तातडीने अंमलबजावणी अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
हे निवेदन देताना आदिम विकास परिषदेचे नितिन पानकर,लखन पवार,शिवाजी भांगे,विदूल अधटराव,राजू अधटराव,धिरज परचंडराव,विजय सुरवसे,ओंकार कोळी,नरेश जवंजाळ,सुनिल हिरणवाळे,उमेश साळुंके,विलीन परचंडराव,तुषार अधटराव आदी उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


