पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर- राखी पौर्णिमेला सर्वत्र बहिण भावाला राखी बांधून ओवाळते आणि दिवस आनंदात साजरा केला जातो. परंतु स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी निव्वळ खर्च आणि मौज मजा करण्याचे टाळून रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम पालवीतील चिमुकल्यांसोबत अनोख्या पद्धतीने साजरा करून समाजात एक आगळा वेगळा आदर्श घालून दिला.याचेच कौतुक पंढरपूर पंचक्रोशीत होत आहे.
त्याचे झाले असे की, रक्षाबंधन दिनी सकाळी स्वेरीतून मेसा (मेकॅनिकल इंजिनीरिंग स्टुडंट्स अससोसिएशन) चा ताफा कोर्टीमधील पालवीकडे मार्गस्थ झाला. तेथे पोहोचल्यानंतर पालवी अनाथाश्रमात चिमुकली मुले हसतमुखाने स्वागत करण्यात आले. यामध्ये सुरुवातीला अनिकेत शिंदे या विद्यार्थ्याने कार्यक्रमाचा हेतू सांगून पालवीतील बाल विद्यार्थ्यांच्या सहवासात काही काळ घालविण्याची भूमिका स्पष्ट केली. यानंतर विद्यार्थ्यांची मनोगते व सुमधुर गीतगायन झाली. पालवीच्या संचालिका सौ मंगल शहा यांनी मनोगत व्यक्त केले. याचवेळी योगायोगाने पालवीमधील सपना या चिमुकलीचा वाढदिवसही देखील साजरा करण्यात आला . यानंतर पालवीचा वचननामा सादर करण्यात आला ज्यामध्ये पालवीच्या विद्यार्थ्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या यांचे भावनिक शब्दात वर्णन केले होते. त्या भावपूर्ण वचननाम्याने उपस्थितांच्या अंगावर शहारे आले. यानंतर पवित्र अशा रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला. ज्यामध्ये पालवीच्या चिमुकल्यांनी श्री विठ्ठल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या. यानंतर खाऊवाटपाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी पालवीत आवश्यक असलेल्या काही गरजू वस्तूही विद्यार्थ्यांनी दिल्या.याप्रसंगी बाजारातून राख्या विकत घेणे टाळून पालवीच्या विद्यार्थ्यांनी चिमुकल्या हातांनी बनवलेल्या राख्या विकत घेऊन मदतीचे योगदान दिले व जवळपास दहा हजार रुपयापर्यंतचा सर्व खर्च विद्यार्थ्यांनी आपल्या स्वखर्चातूनच केला. तेथील कर्मचारी हरीश यांनी पालवीच्या वाटचालीची माहिती देणारा भावपूर्ण व्हिडिओ सादर केला.यानंतर पालवीच्या संस्थापिका डिंपल घाडगे यांनी पालवीची माहिती देताना भावूक झाल्या होत्या. गरज आहे ती अशा सेवाभावी संस्थांना मदत करण्याची ! या कार्यक्रमासाठी सुमारे स्वेरीचे सव्वाशे विद्यार्थ्यांसह मेसा समन्वयक नितीन कदम,जगदीश पिसे,प्रज्योत घोंगडे, ज्ञानराज तेलंग, अक्षय खांडेकर, उमेश भक्ते, गणेश सानप यांनी योगदान दिले. या कार्यक्रमासाठी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे स.पो. नि. गालिंदे व पोलीस अधिकारी यांनी देखील आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.यावेळी शिक्षक समन्वयक प्रा.ए.के.पारखे व प्रा.एस.वाय.साळुंखे, प्रा. एस.बी.भोसले, प्रा.डी.एस. घोडके, प्रा.डी.टी.काशीद,प्रा.व्ही.आर.चव्हाण आदी शिक्षकही उपस्थित होते हा कार्यक्रम स्वेरीतील मेकॅनिकल इंजिनीरिंग स्टुडंट्स अससोसिएशन अंतर्गत घेण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय कोरे याने केले तर मेसा अध्यक्ष आशिष शहाणे यांनी आभार मानले. सायंकाळच्या सुमारास चिमुकल्यांचा निरोप घेताना मात्र सर्वांचे डोळे पाणावले होते.
छायाचित्र- स्वेरीतील विद्यार्थ्यांनी पालवीतील विध्यार्थ्यांसमवेत रक्षा बंधनाचा कार्यक्रम साजरा करताना पालवीतील चिमुकली मुले व स्वेरीतील विद्यार्थी.
From-
Shri. Santosh C. Halkude
Pandharpur – 413 304.
Mob: 9545 55 36 28,
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
Shri. Santosh C. Halkude
Pandharpur – 413 304.
Mob: 9545 55 36 28,
9850 24 21 55 .
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111






