पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 9 August 2017
एक मराठा, लाख मराठा’…मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, आरक्षण देता की जाता…असा आवाज आज मुंबईत घुमला. राज्यभरात ५७ मोर्चे काढले आहेत. मुंबईतील हा अखेरचा मोर्चा असणार आहे. त्यामुळं आता आरक्षण देता की जाता, असा निर्वाणीचा इशाराच मराठा क्रांती मूक मोर्चातून सरकारला देण्यात आला. मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचं निवेदन दिलं. ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय येथून हलणार नाही, असा निर्धार शिष्टमंडळातील सदस्यांनी व्यक्त केला.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं या प्रमुख मागणीसह इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी आज मुंबईत सकाळी मराठा समाजाच्या वतीनं विराट मोर्चा काढण्यात आला. भायखळा येथून मोर्चाला सुरूवात झाली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजातील तरुण, महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाच्या मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारी साडे बाराच्या सुमारास मोर्चा आझाद मैदानात दाखल झाला. या ठिकाणी मोर्चाचे सभेत रुपांतर झालं. यावेळी व्यासपीठावर तरुणी आणि मुलींची भाषणे सुरू झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, असं त्यांनी भाषणातून सांगितलं.
दरम्यान, मराठा समाजाच्या मागण्यांचं निवेदन देण्यासाठी समाजाच्या वतीनं शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलं. या शिष्टमंडळात मराठा समाजातील सहा मुलींचा समावेश होता. त्यांनी विधानभवनात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिलं. सरकारकडून ठोस उत्तर मिळाल्याशिवाय येथून हलणार नाही, असा निर्धार शिष्टमंडळात सहभागी झालेल्या मुलींनी व्यक्त केला.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !






