👁 9 Views

सासूवर बलात्कार करून मारहाणीचा बदला, जावयावर गुन्हा दाखल..

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..

पंढरपूर Live 10  August 2017

आष्टी- सासऱ्याने वर्षभरापूर्वी केलेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी जावयाने सासूवर बलात्कार केल्याची घटना आष्टी तालुक्यातील वाकी येथील पारधी वस्तीवर ३ ऑगस्ट २०१७ रोजी रात्री साडेदहा वाजता घडली. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात जावयावर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेनंतर दोघे फरार झाले असून पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात सासूवर बलात्कार करण्यासाठी आईनेच मुलाला मदत केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुढे वाचा

आष्टी ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार वाकी येथील पारधी वस्तीवर ३ ऑगस्ट २०१७ रोजी रात्री साडेदहा एक तरुण व त्याची आई ( दोघे रा. माहिजळगाव ता.कर्जत जि.अहमदनगर ) हे माय- लेक त्याच्या सासुरवाडीला गेले होते. तरुण सासूच्या घरात गेला असता आईने घराला बाहेरून कडी लावली. सासऱ्याने एक वर्षापूर्वी मला का मारले असा जाब विचारत त्या तरुणाने सासूला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला. घडलेला प्रकार जर कोणाला सांगितला तर तुला जिवे मारेल अशी धमकीही त्याने सासूला दिली. याबाबत सासूने आष्टी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून तरुण व त्याच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाला पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व स.पो.नि.यशवंत बारवकर यांनी भेट दिली.
बलात्काराच्या गुन्ह्यानंतर माय-लेकाला अटक करण्यासाठी आष्टी पोलिस व कडा चौकीचे संयुक्त पथक नगर जिल्ह्यातील मिरजगाव येथे रवाना झाले आहे. आरोपी माय-लेक फरार आहेत.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *