👁 12 Views

कुतूहल…!! उद्या 12 ऑगस्टला होणार नाही रात्र… ?

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..


पंढरपूर Live 11  August 2017

नवी दिल्ली – सध्या सोशल मीडियात एक मेसेज प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या मेसेजमध्ये असे काही म्हटले आहे ज्याच्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. या मेसेजमध्ये म्हटलं आहे की, 12 ऑगस्ट 2017 रोजी रात्र होणार नाहीये, म्हणजेच रात्रीच्या वेळीही दिवसाप्रमाणेच प्रकाश असणार आहे.

नासानेही हा चमत्कार इतिहासात प्रथमच होणार असल्याचा दावा केला आहे. व्हायरल झालेल्या मेसेजनुसार, 96 वर्षांत पहिल्यांदाच 12 ऑगस्ट रोजी रात्र होणार नाहीये. म्हणजेच दिवसातील 24 तासही प्रकाशच राहणार आहे. आकाशात उल्कापात होणार असल्याने प्रकाश निर्माण होणार आहे. त्यामुळे हा दुर्मिळ खगोलयोग न पाहणाऱ्याला मोठे नुकसान होऊ शकते.

खरे तर 12 ऑगस्ट रोजी रात्री आकाशात उल्कापात होणार आहे त्यामुळे रात्रीही काहीप्रमाणात प्रकाश निर्माण होणार आहे. नासानेही म्हटलं आहे की, रात्रीही दिवसाप्रमाणे प्रकाश असणार असे काहीही नाही. नासाच्या साईटवर दिलेल्या रिपोर्टनुसार, 12 ऑगस्ट रोजी उल्कापात होणार आहे. त्यामुळे रात्री थोडा उजेड निर्माण होईल. प्रत्येकवर्षी तीन मोठे उल्कापात होतात. यापैकी पहिला उल्कापात हा जानेवारी महिन्यात, दुसरा उल्कापात ऑगस्ट महिन्यात तर तिसरा डिसेंबर महिन्यात पहायला मिळतो.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *