👁 11 Views

श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व्यवस्थापकाला बेदम मारहाण का झाली..? बघा सविस्तर वृत्त!!

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
 Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



पंढरपूर Live 14  August 2017


श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक तथा नायब तहसिलदार विलास अंबादास महाजन यांना झालेले मारहाणी संदर्भात पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात एकजणावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर आरोपीने महाजन यांना मंदिराचे व्हीआयपी गेटवर आधी धमकी दिली व नंतर स्टेशनरोडवरुन महाजन घराकडे जात असताना त्यांच्या मोटारसायकलला लाथ मारुन प्रथम त्यांना खाली पाडले व नंतर लाथाबुक्क्याने त्यांना जबर मारहाण केली.

_____________________________________

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

_____________________________________

माझी माणसे दर्शनासाठी सोडत नाहीत काय? असे धमकावणार्‍याने श्रीविठ्ठल मंदिराच्या व्यवस्थापकांना लाथा बुक्क्याने मारले..! बघा सविस्तर.. काय आहे ही घटना!

महाजन यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दि.13.8.17 रोजी रात्री 11 वा. 15 वा. श्रीविठ्ठल मंदिराचे व्हीआयपी गेटजवळ आरोपी दत्ता संगीतराव, रा. पंढरपूर याने महाजन यांना शासकीय काम करत असताना धमकी दिली की, तुम्ही जाणुन बुजून माझे दर्शनाकरीता आलेले लोक सोडत नाही, तुम्हाला लय माज आला आहे. तुम्ही बाहेर या बघून घेतो. यानंतर महाजन हे कामकाज करुन आपल्या घराकडे जात असताना जुने पॉप्युलर हॉटेल समोर, संत गाडगे महाराज मठाजवळ आरोपी संगीतराव याने महाजन यांचे पाठीमागून येत त्यांचे गाडीवर लाथ मारल्याने ते खाली पडले. यात त्यांचे गुडघा, अंगठा, हाताचा कोपरा आदी ठिकाणी खरचटून मार लागला. यानंतर संगीतराव याने महाजन यांना मुक्कामार देत लाथाबुक्क्याने मारहाण केली, त्यांचे नाकावर ठोसा दिला. त्यामुळे रक्तस्त्राव झाला. असे फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपीवर पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात भा.दं.वि.कलम 353, 323, 332, 337, 504 व 506 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास पो.नि. विठ्ठल दबडे हे करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *