👁 10 Views

उजनी डावा कालवा वितरीका क्र.38 ला पाणी सोडण्यासाठी ना.चिंचोली ग्रामस्थांनी रोपळे शाखा कार्यालयास ठोकले टाळे

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व 
Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 16  August 2017 


उजनी डावा कालवा वितरीका क्र.38 ला पाणी सोडण्यासाठी ना.चिंचोली ग्रामस्थांनी रोपळे शाखा कार्यालयास ठोकले टाळे 
 भर पावसाळयात सोलापूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंंगाम हातचा गेल्यात जमा असतानाच शेतात उभी असलेली पिके कशीबशी वाचविण्यासाठी शेतकरी जिवाचे रान करीत आहेत.पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे उजनी धरण काही प्रमाणात भरले असताना उजनीच्या डाव्या व उजव्या वितरीकेतून पाणी सोडन्यात आले आहे.मात्र उजनी डाव्या कालव्याच्या वितरीका क्रमांक 38 ला पाणी सोडण्यात आले नाही.शासन नियमाप्रमाणे टेल टू हेड रोटेशन प्रमाणे पाणी सोडणे गरजेचे असताना या बाबत टाळाटाळ केली गेल्याने  नारायण चिंचोली ग्रामस्थांचा संयमाचा बांध आज अखेर फुटला असून पाटबंधारे विभागाच्या रोपळे येथील कार्यालयास टाळे ठोकुन निषेध करण्यात आला आहे.
                या बितरीकेस पाणी सोडण्यात यावे म्हणुन आमदार बबनदादा शिंदे,मा.आ.सुधाकरपंत परिचारक यांनी पाटबंधारे विभागाच्या संबधीत अधिकार्‍यांना या वितरीकेस पाणी सोडण्याचे आवाहन केले होते.मात्र त्यांच्या आवाहनास न जुमानता पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व अधिकारी मनमानी पध्दतीने कारभार करीत असल्याच्या निषेधार्थ नारायण चिंचोली ग्रामस्थांनी आज रोपळे येथे जावून या कार्यालयास टाळे ठोकले.
         यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.उपसभापती लक्ष्मणराव धनवडे,सत्यनारायणदेव कालवा पाणी वापर संस्थेचे चेअरमन चंद्रकांत कदम,हनुमान पाणी वापर संस्थेचे चेअरमन धर्मराज नलवडे,मा.सरपंच नितिन मस्के,विठ्ठल माने,विष्णू माने,ुशिवाजी वसेकर,भास्कर गुंड,ज्ञानेश्‍वर वाघमोडे,संदीप हिंगमीरे,सचिन घाडगे,हरिभाऊ खरात,बंडू मस्के यांच्यासह नारायण चिंचोली ग्रामस्थ व लाभधारक शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

     या आंदोलनानंतर पाटबंधारे विभागाबे श्री पाटील यांनी या विररीकेस त्वरीत पाणी सोडले जाईल असे लेखी आश्‍वासन ग्रामस्थांना दिले आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *